ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

*अतिवृष्टीचा कहर! पाताळगंगा नदीचे रौद्ररूप; खालापूर शहर जलमय, शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान*


*रेड अलर्टदरम्यान मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; नगरपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..*

वावोशी /जतिन मोरे:-    हवामान खात्याने रायगडसह पुणे, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असतानाच ५ जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसाने खालापूर शहराला अक्षरशः जलसमाधी दिली. मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीने धोकादायक पातळी गाठत रौद्ररूप धारण केले आणि नदीचे पाणी थेट खालापूर शहरात शिरल्याने अनेक घरे, दुकाने व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
       अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक कुटुंबांना घरातील आवश्यक वस्तूही बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, फर्निचर, विद्युत उपकरणे, कागदपत्रे तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खालापूर नगरपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. प्रशासनाच्या वेळेवर केलेल्या मदतकार्यामुळे कोणतीही जीवितहानी टळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. दरम्यान, स्थानिक पत्रकार विशाल वाघमारे यांच्या घरातही पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या कुटुंबालाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर शहरात सर्वत्र चिखल, कचरा आणि नुकसानग्रस्त वस्तूंचे चित्र पाहायला मिळत असून नागरिकांनी पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच भविष्यात अशा आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी कायमस्वरूपी पूरनियंत्रण उपाययोजना राबविण्याचीही मागणी जोर धरत आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट