*अतिवृष्टीचा कहर! पाताळगंगा नदीचे रौद्ररूप; खालापूर शहर जलमय, शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान*
*रेड अलर्टदरम्यान मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; नगरपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..*
वावोशी /जतिन मोरे:- हवामान खात्याने रायगडसह पुणे, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असतानाच ५ जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसाने खालापूर शहराला अक्षरशः जलसमाधी दिली. मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीने धोकादायक पातळी गाठत रौद्ररूप धारण केले आणि नदीचे पाणी थेट खालापूर शहरात शिरल्याने अनेक घरे, दुकाने व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक कुटुंबांना घरातील आवश्यक वस्तूही बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, फर्निचर, विद्युत उपकरणे, कागदपत्रे तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खालापूर नगरपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. प्रशासनाच्या वेळेवर केलेल्या मदतकार्यामुळे कोणतीही जीवितहानी टळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. दरम्यान, स्थानिक पत्रकार विशाल वाघमारे यांच्या घरातही पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या कुटुंबालाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर शहरात सर्वत्र चिखल, कचरा आणि नुकसानग्रस्त वस्तूंचे चित्र पाहायला मिळत असून नागरिकांनी पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच भविष्यात अशा आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी कायमस्वरूपी पूरनियंत्रण उपाययोजना राबविण्याचीही मागणी जोर धरत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times