बाळकुम येथील प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पास स्थगिती द्या बेसुमार वृक्षतोडीची चौकशी करा खासदार नरेश म्हस्के यांचे ठाणे मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ठाणे - बाळकुम येथील प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण, पाणी व वीज वापरावर अतिरिक्त ताण येणार आहे. गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा या प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेऊन सदर प्रकल्पास तात्काळ स्थगिती यावी तसेच प्रकल्पा ठिकाणी बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
बाळकुम येथे प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाबाबत लोढा हासीया क्लब, फेअर फील्ड को. ऑ. हाऊसिंग सोसायटी, व्हीएफव्हीए को. ऑ. हाऊसिंग सोसायटी व इतर गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटनांनी आक्षेप घेत प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी नुकतीच खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेऊन चर्चा करत प्रकल्प रद्द करण्यासाठी व बेसुमार वृक्ष तोडीची चौकशी करण्याचे निवेदन दिले. या निवेदनाची गंभीर दखल खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली आहे.
बाळकुम येथे प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाच्या परिसरात अनेक निवासी संकुले, शाळा, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक सुविधा आहेत. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारल्यास वाहतूक कोंडी वाढणे, ध्वनी व वायू प्रदूषणात वाढ होणे, पाणी व वीज यांवरील अतिरिक्त ताण वाढणे तसेच परिसरातील नागरिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणे शहर आधीच वाहतूक, पाणीटंचाई आणि पर्यावरणीय समस्यांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पामुळे शहरावरील ताण अधिक वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना नेमका काय लाभ होणार, रोजगाराच्या किती संधी निर्माण होणार आणि शहराच्या विकासात त्याचे योगदान काय असेल याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही, असे खासदार नरेश म्हस्के यांनी निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक परवानग्या, पर्यावरणीय मंजुरी, त्यासंदर्भातील अटी व त्यांचे पालन याबाबतही नागरिकांमध्ये शंका आणि संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्व बाबी पारदर्शकपणे नागरिकांसमोर मांडणे आवश्यक असताना तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच येथे ठाणे महापालिकेने दिलेल्या परवागीपेक्षा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाच्या सर्व कामांना तात्काळ स्थगिती द्यावी, प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या, मंजुरी व पर्यावरणीय अटींची स्वतंत्र तज्ञ समितीमार्फत फेरतपासणी करावी; स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सविस्तर सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी; पर्यावरण, वाहतूक, पाणी वापर आणि ध्वनी प्रदूषण यासंदर्भातील सर्व अहवाल सार्वजनिक करावेत; स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी आणि तज्ञ यांच्या संयुक्त बैठकीत नागरिकांच्या आक्षेपांवर निर्णय घ्यावा तसेच नागरिकांचा तीव्र विरोध आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन सदर प्रकल्पास तात्काळ स्थगिती देण्याबरोबरच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times