ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

भरधाव कारचा कहर; पादचाऱ्यांना चिरडून एकाचा मृत्यू, पाच जण जखमी


तळोज्यातील भीषण अपघातानंतर चालक फरार; रिक्षा, टेम्पो व तीन दुचाकींचे नुकसान
पनवेल, दि. ७ : तळोजा सेक्टर-१० परिसरात मंगळवारी दुपारी भरधाव कारने पादचाऱ्यांना चिरडल्याने एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर चालक वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा इलेक्ट्रिक कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावरील नागरिकांना तसेच वाहनांना धडक दिली. या अपघातात नदीम खान यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये शराफुद्दीन शाकिर अली (४३), रामदुलारे रामसहाय गुप्ता (३७), सनी महेंद्र निषाद (३३), विघ्नेश संतोष पानसरे (१७) व मोहम्मद गुलफराज एमडी नसीम शेख (२८) यांचा समावेश आहे.



जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. विघ्नेश पानसरे यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून इतरांना डोके, पाठ, मान व शरीराच्या विविध भागांना दुखापत झाली आहे. उपचारानंतर काही जखमींना घरी सोडण्यात आले आहे.
अपघातात एक रिक्षा, एक टेम्पो आणि तीन मोटारसायकलींचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे फरार चालकाचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले की, अपघातानंतर चालक फरार झाला असून त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, चालक मद्यधुंद अवस्थेत होता का यासह विविध बाबींचा तपास सुरू आहे.


अपघाताची माहिती मिळताच शिवसेना धावली मदतीला
तळोजा सेक्टर-10 फेज-1 येथे झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, कैलास पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत करण्याबरोबरच पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून बचावकार्याला सहकार्य करण्यात आले. अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घेतला.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट