ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

राज्य कबड्डी संघटनेचे कबड्डी दिन पुरस्कार जाहीर, मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार

राज्य कबड्डी संघटनेचे कबड्डी दिन पुरस्कार जाहीर

दै.सामनाच्या मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार

राज्य कबड्डी संघटनेचे कबड्डी दिन पुरस्कार जाहीर
दिनकर पाटील, शंकुतला खटावकर यांनी जीवन गौरव

मुंबई, दि. ८ (क्री.प्र.) — मैदानावर कबड्डीपटूंवर अन्याय होताच आपल्या लेखणीला धार देणारे, खेळाडूंचा आवाज दाबताच व्यवस्थेला जाब विचारणारे आणि कबड्डीपटूंच्या हक्कासाठी प्रसंगी व्यवस्थेशी दोन हात करणारे आणि कबड्डीतील अन्यायाविरुद्धचा संताप आपल्या बातम्यांमधून सातत्याने मांडणारे दै. ‘सामना’चे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांच्या लढाऊ पत्रकारितेचा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने गौरव केला आहे. संघटनेने आपल्या २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत त्यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार जाहीर केला असून त्याचबरोबर आपल्या विविध पुरस्कारांचीही घोषणा केली.
तसेच कबड्डीसाठी आयुष्य झिजवणारे दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना प्रतिष्ठेच्या कबड्डी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ज्येष्ठ खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते, पत्रकार आणि गुणवंत कबड्डीपटूंवर यंदा पुरस्कारांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला आहे. येत्या १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती राज्य कबड्डी संघटनेने पत्रकाद्वारे दिली आहे.
कबड्डी दिन पुरस्कार विजेते
कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार  : दिनकर पाटील (सांगली), शकुंतला खटावकर (पुणे).
ज्येष्ठ पत्रकार : मंगेश वरवडेकर (दै. सामना),
अलताफ कडकाले (दै. सकाळ)
ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार : आत्माराम घेगडे, बंडूकांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल, विलास सावंत.
ज्येष्ठ पंच पुरस्कार : प्रकाश मोरे, रविंद्र लाड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मिक बागुल,मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस, रामदास गोळे.
ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार : सुरेश मोरे, शशिकांत कोरगांवकर, रवींद्र लवेकर,तुळसीदास रोकडे,ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, अलका कारखानीस, मदन गायकवा
रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार- दीपक कांदळगांवकर (उपनगर),
डॉ. शिवशंकर कापसे (हिंगोली), अरुणा गावडे (कोल्हापूर)
कृतज्ञता पुरस्कार- निवृत्ती देसाई, सोपान काकडे, सदानंद जोशी, अभिजित राणे.
फिदा कुरेशी स्मरणार्थ ज्येष्ठ प्रशिक्षक- नारायण गायकवाड (ठाणे),सुहास कदम (मुंबई उपनगर)
किशोर व कुमार गट शिष्यवृत्ती विजेते
किशोर गट : सुरज राठोड (रत्नागिरी), प्रशांत अकीगे (कोल्हापूर), ध्रुव डोंगरे (पालघर).
किशोरी गट : आरती खांडेकर (पुणे), सेजल काकडे (नाशिक), ज्ञानेश्वरी ढवण (अहिल्यानगर), कुमार गट : शुभम बिटके (पुणे), जीतसिंग सैनी (ठाणे), अतुल जाधव (परभणी). कुमारी गट : संजना भोईर (पालघर), वैभवी जाधव (पुणे), सानिका पाटील(सांगली).
किशोर- किशोरी गट शिष्यवृत्ती : दिपराज कांबळे (परभणी), मैत्री इंगळे (सातारा)
सर्वोत्कृष्ट चढाईपटू पुरस्कार  : सौरभ राऊत (अहिल्यानगर), यामिका पुजारी (मुंबई उपनगर)
उत्कृष्ट कबड्डीपटू पुरस्कार : शिवम पठारे, (अहिल्यानगर), निकिता पडवळ (पुणे).
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व
 कुमार गट : प्रसाद दिलीप (पुणे)
 कुमारी गट : सेरेना म्हस्कर (मुंबई उपनगर
प्रथम जिल्हा संघ पुरस्कार : अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटना
उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा : नाशिक जिल्हा कबड्डी संघटना व सह्याद्री युवा मंच सिन्नर, नाशिक

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble (sub editor)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट