पी.ई.एस. ग्लोबल स्कूलमध्ये वनमहोत्सव सप्ताह उत्साहात; विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ठाणे: पी.ई.एस. ग्लोबल स्कूल, ठाणे (पूर्व) येथे वनमहोत्सव सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने आठवडाभर विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दोन तासांमध्ये वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडले. इयत्ता १ ली ते २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘झाडे आपले मित्र’ या विषयावर चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता ३ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘झाडे वाचवा – पृथ्वी वाचवा’ या विषयावर आकर्षक पोस्टर्स तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात वृक्षारोपण करून रोपांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. तर इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुंडी सजावट (Plant Pot Decoration) स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सजविलेल्या कुंड्यांमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनाची गरज आणि शाश्वत विकासाबाबत जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्पही केला.
शाळेचे प्राचार्य श्री. अल्हाद जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करताना, “आजची पिढी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारेल, तेव्हाच उज्ज्वल आणि हरित भारताचे स्वप्न साकार होईल. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे,” असे आवाहन केले.
वनमहोत्सव सप्ताहाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ, हरित भारत घडविण्यासाठी सक्रिय योगदान देण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times