कल्याणमध्ये भलीमोठी इमारत पत्त्यांसारखी कोसळली, अंगावर काटा आणणारी दृश्य
- by
- Jul 13, 2026
ठाणे: कल्याणमध्ये इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी ही भलीमोठी इमारत कोसळली आहे. इमारतीचा कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जवळपास चार ते पाच मजल्यांची ही इमारत आगेवरतीच कोसळताना दिसत आहे. है दृश्य चित्तथरारक आणि थरकाप उडवणारी आहेत. सुदैवाने या इमारत दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही इमारत रि-डेव्हलोपमेटला गेली होती. टप्प्याटप्प्याने तिर्थ पाडकाम केलं जात होतं. पण दुपारच्या सुमारास ही इमारत अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली.
या इमारतीत कुणीही वास्तव्यास नव्हतं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या इमारतीचा मलबा थेट रस्त्यावर देखील आला, यावेळी रस्त्याने जाणारी कुठली गाड़ी नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही घटना घडली तेव्हा बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी जीव मुठीत घेत घरातून बाहेर निघण्याचा प्रयान केला. यावेळी त्यांनी घट खिडकीतून घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यात त्यांना यश आले. त्यामुळे ते या घटनेत बचावल्याची चर्चा आहे.
कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात ही घटना घडली. संबंधित घटना ही दुपारी 2 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. रि-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरु असलेल्या विनायक दर्शन इमारतींचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला, इमारत कोसळतानाचा थरारक
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेवर आता कल्याणमधील लोकप्रतिनिधींकडून काही प्रतिक्रिया येते का? तसेच या प्रकरणी कुणावर कारवाई केले जाते का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तसेच या इमारतीत दुर्घटना घडली तेव्हा खरंच कुणीही नव्हते का? याचीदेखील खातरजमा करणे आवश्यक आहे. या प्रकरणी पोलीस आणि इतर यंत्रणाकडून खरंच काही कारवाई केली जाते का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
कल्याणमधील विनायक दर्शन इमारतीच्या कोसळणाऱ्या घटनेवर तुम्हाला काय वाटते? कृपया तुमचे विचार कमेट बौक्समध्ये शेअर करा.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times