भालगावचे अमोल गोळे यांचे ’मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी’ पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेत घवघवीत यश
- by
- Jul 14, 2026
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची गरुडझेप
भालगावचे अमोल गोळे यांचे ’मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी’ पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेत घवघवीत यश
रोहा/भालगाव:
परिस्थितीवर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील जागतिक पातळीवर संशोधनात नाव कमवू शकतात, हे भालगावच्या सुपुत्राने सिद्ध केले आहे. ’द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय, भालगाव’ चे माजी विद्यार्थी श्री. अमोल छापा जयवंत गोळे यांनी पीएच.डी. (Medical Dialysis Technology) या अभ्यासक्रमाची मुख्य कोर्सवर्क परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे भालगाव परिसराचे नाव वैद्यकीय संशोधन क्षेत्रात उंचावले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात किडनी (मूत्रपिंड) आणि यकृत (Liver) यांच्याशी संबंधित रुग्णांच्या उपचारातील अत्यंत संवेदनशील भाग मानल्या जाणार्या ’डायलिसिस टेक्नॉलॉजी’ या विषयात सखोल संशोधन करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आज फळाला आले आहेत. या यशानंतर आता त्यांचा पुढील मुख्य संशोधनाचा प्रवास अधिक वेगाने सुरू होणार आहे.
ग्रामीण भागातील शाळेतून शिकून एका विद्यार्थ्याने थेट वैद्यकीय संशोधनाच्या सर्वोच्च पातळीवर यश मिळवणे, हे सर्व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. अमोल गोळे यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल ’द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय’ चे शिक्षक, ग्रामस्थ आणि भालगाव परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
ROHAN RASAL