वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध ठाणे महापालिकेची विशेष मोहिम

  • by
  • Jul 31, 2026


ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुंबा व दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत पाणी जोडण्यांविरोधात  तीन दिवस विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व्हिस स्टेशन, व्यावसायिक वापर, खासगी टैंकर भरण्यासाठी घेण्यात आलेली अनधिकृत पाणी जोडणी तसेच घरगुती अनधिकृत जोडण्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात कल्याणफाटा ते चाय जंक्शन परिसरातील अनधिकृत व्यावसायिक, सब्र्व्हिस स्टेशन व खासगी टैंकरसाठीच्या पाणी जोडण्यांवर तर मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात बाय जंक्शन ते मुंब्रा फायर स्टेशनपर्यंतच्या परिसरातील अनधिकृत जोडण्यांवर कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान अनधिकृत पाणी जोडणी खंडित करण्यात आल्यानंतर संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, खंडित करण्यात आलेली जोडणी पुन्हा सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूबनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मे महिन्यात गणेश नगर, सोनेतळा नगर, आगासन गाब, लालानी नाका तसेच कोसा गाव परिसरात कारवाई करण्यात आली. या कालावधीत २१ अनधिकृत नळ संयोजन खंडित करण्यात आले. याशिवाय जलवाहिन्यांवर बसविण्यात आलेले ४० ओव्हरव्हॉल्व्ह नळ देखील काढून टाकण्यात आले. जून महिन्यात महालक्ष्मी नगर, शिळफाटा, सदुरू नगर, लालानी नाका, गुलाब पार्क आदी भागांमध्ये मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान २० अनधिकृत नळ संयोजन खंडित करून संबंधित ठिकाणांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जुलै महिन्यात कोसा गाव, शिवाजी नगर, बडेकर मळा, दिवा पूर्व तसेच इतर परिसरांमध्ये विशेष तपासणी करण्यात आली. या मोहिमेत २४ अनधिकृत नळ संयोजन शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे जलवाहिन्यांवरील अनधिकृत जोडण्या कमी होण्यास मदत होत असून, पाणीगळती व पाणीचोरीचर नियंत्रण मिळविण्यासही मदत होत आहे. त्यामुळे अधिकृत ग्राहकांना नियमानुसार पाणीपुरवठा करणे अधिक प्रभावी होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना अधिकृत प्रक्रियेद्वारेच नळ जोडणी घेण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत नळ जोडण्या करून पाणीचोरी करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी महापालिकेला कळवावी, असे उपनगर अभियंता, पाणीपुरवठा यांनी केले आहे. 

तीन महिन्यात ६५ अनधिकृत नळ संयोजनांवर कारवाई

ठाणे महानगरपालिकेच्या दिवा - मुंब्रा पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीचोरी रोखण्यासाठी आणि नागरिकांना नियमानुसार व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुनिद्धित करण्याच्या उद्देशाने अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मे, जून आणि जुलै २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत मुंद्रा दिवा परिसरातील विविध भागांमध्ये तपासणी करून एकूण ६५ अनधिकृत नळ संयोजनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित ठिकाणांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट