वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार भव्य वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय राज्य शासनाकडून निधीला मंजुरी: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

  • by
  • Jul 31, 2026

 ठाणे: मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाणे शहरातही निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडविणारे अत्याधुनिक बनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. ४, मौजे चितळसर-मानपाडा (टिकुजिनी वाडी) येथील सुमारे १० हेक्टर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील महानगरपालिकां मध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अनुदान दिले जाते. त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार ठाणे शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून, त्यामध्ये या वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या विकासाचाही समावेश करण्यात आला आहे. वेगाने बिस्तारत असलेल्या ठाणे शहराला केवळ रस्ते, पूल आणि इमारतींचीच नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानात भर घालणाऱ्या पर्यावरणपूरक प्रकल्पांचीही आवश्यकता आहे. मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाप्रमाणे ठाणेकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा मिळावा, मुलांना जैवविविधतेची ओळख व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार नव्या पिढीमध्ये रुजावेत, या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. चितळसर-मानपाडा परिसरातील सर्वे क्रमांक ५१/अ/१/१ येथील जागेवर प्रस्तावित या प्रकल्पामुळे ठाणे शहराला एक नवे 'ग्रीन डेस्टिनेशन' मिळणार आहे. विविध प्रजातींच्या वनस्पतींचे संवर्धन, पर्यावरणविषयक जनजागृती, जैवविविधतेचे दर्शन आणि नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करण्याचा मानस आहे. राज्य शासनाच्या २० जुलै २०२६ रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामांसाठी एकूण १५० कोटींची मंजूर रकम नमूद करण्यात आली चितळसर-मानपाड्यातील १० हेक्टर जागेवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामध्ये या प्रकल्पासाठी सुरुवातीला १० कोटींची तरतूद दर्शविण्यात आली आहे. सरनाईक म्हणाले, ठाणे शहराचा विकास करताना पर्यावरण आणि नागरीकरण यांचा समतोल राखणे ही आमची प्राथमिकता आहे. या उद्यानामुळे ठाणेकरांना शहरातच निसर्ग अनुभवता येईल. विशेषतः विद्यार्थी आणि नव्या पिढीसाठी हा प्रकल्प मनोरंजनासोबतच निसर्गशिक्षणाचे केंद्र ठरेल. भविष्यात ठाण्याची ओळख वाढविणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये या उद्यानाचा समावेश व्हावा, या दृष्टीने त्याचा दर्जे महत्त्वाच्या 60 ठाणेकरांना मुंबईत जावे लागू नये; ठाण्यातच कुटुंबासह निसर्ग, जैवविविधता आणि विरंगुळ्याचा समृद्ध अनुभव मिळावा, हेच या प्रकल्पामागचे उद्दिष्ट आहे. प्रताप सरनाईक दार विकास केला जाईल. या प्रकल्पामुळे चितळसर-मानपाडा परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच ठाण्याच्या पर्यटन क्षमतेलाही नवी चालना मिळणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट