नागरिकांशी थेट संवादासाठी जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत Public App खाते सुरू
- by
- Aug 06, 2026
शासनाच्या योजना, विकासकामे आणि महत्त्वाची माहिती आता एका क्लिकवर
ठाणे : नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, विकासकामे, जनजागृती मोहिमा तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची अधिकृत आणि अद्ययावत माहिती जलद, पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे यांनी Public App वर अधिकृत खाते सुरू केले आहे.
डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेऊन नागरिकांना अधिकृत माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणेने या लोकप्रिय डिजिटल व्यासपीठावर आपली उपस्थिती नोंदविली आहे. या माध्यमातून विविध विभागांच्या शासकीय योजना, विकासकामे, प्रेसनोट, जनजागृती मोहिमा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, समाजकल्याण, महिला व बालविकास, पाणीपुरवठा, कृषी तसेच इतर विभागांशी संबंधित महत्त्वपूर्ण सूचना नागरिकांपर्यंत नियमितपणे पोहोचविण्यात येणार आहेत.
याशिवाय निविदा, यशोगाथा, आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक सूचना आणि जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांची माहितीही या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अधिकृत स्रोतावरून माहिती उपलब्ध होत असल्याने नागरिकांना अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
यापूर्वीपासून कार्यरत असलेल्या Facebook, Instagram, YouTube आणि X (पूर्वीचे Twitter) या अधिकृत सोशल मीडिया खात्यांबरोबरच आता Public App हे आणखी एक प्रभावी संवाद माध्यम नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना, विकासकामे, प्रेसनोट, जनजागृती मोहिमा आणि लोकहिताच्या उपक्रमांची माहिती अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले की, "डिजिटल माध्यमांच्या युगात नागरिकांपर्यंत शासनाची माहिती जलद, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत Public App खाते प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरेल. शासनाच्या विविध योजना आणि विकासकामांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत वेळेत पोहोचावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे."
त्यांनी नागरिकांना जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत Public App खाते Follow करून शासनाच्या योजना, उपक्रम आणि अधिकृत माहितीसाठी याच माध्यमाचा वापर करण्याचे आवाहन केले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times