बेकायदेशीर गर्भलिंग निदानाविरोधात जनजागृती मोहीम; ठाणे येथे विधी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण
- by
- Aug 06, 2026
ठाणे : समाजात मुलगा-मुलगी समानतेची भावना अधिक दृढ व्हावी आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यांना आळा बसावा, या उद्देशाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने 'बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रतिबंध' या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. डी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र एम. पाजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिव रविंद्र एम. पाजणकर यांनी विधी स्वयंसेवकांना समाजात जाऊन नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले. बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विधी स्वयंसेवकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षक म्हणून अॅड. अर्चना शेगोकर यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून 'बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा' याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समाजात कुठेही गर्भलिंग निदानाचा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास त्याची माहिती तात्काळ संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना केले.
यानंतर समाजसेवक रघुनाथ देशमुख यांनी काव्याच्या माध्यमातून लिंगानुपातातील असमतोल, स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानामुळे समाजावर होणारे गंभीर परिणाम प्रभावीपणे मांडले. त्यांनी या विषयावर स्वतः लिहिलेल्या कविता सादर केल्या. त्यांच्या काव्यसादरीकरणामुळे उपस्थित स्वयंसेवकांना या सामाजिक समस्येची तीव्रता आणि गांभीर्य अधिक प्रभावीपणे समजले.
कार्यक्रमाच्या शेवटी सचिव रविंद्र एम. पाजणकर यांनी प्रत्येक विधी स्वयंसेवकाने आपल्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर गर्भलिंग निदानाविरोधात व्यापक जनजागृती करावी, अशा प्रकारांची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणेला द्यावी आणि कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times