सिंघानिया स्कूलऐवजी निर्वासितांचा वारसा जपणारे ऐतिहासिक संग्रहालय उभारा : कायद्याने वागा
- by
- Aug 10, 2026
उल्हासनगर : ८ ऑगस्ट १९४९ हा उल्हासनगरचा स्थापना दिन. भारतात आलेल्या सिंधी-मराठी निर्वासितांच्या संघर्षाशी या दिवसाचा ऐतिहासिक संबंध आहे. त्यामुळे निर्वासितांच्या संघर्षापासून झालेल्या उत्कर्षाचा इतिहास जतन करणारे आणि पुढील पिढ्यांना तो समजावून सांगणारे ऐतिहासिक संग्रहालय उल्हासनगरमध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी ‘कायद्याने वागा’ चळवळीचे अध्यक्ष व प्रणेते राज असरोडकर यांनी केली आहे.
उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या विराट अंबे येथील जलतरण तलावाच्या जागेवर हे संग्रहालय उभारावे, अशी त्यांची मागणी आहे.
शहरातील व्यापारी, कामगार आणि कष्टकरी नागरिकांच्या अथक परिश्रमातून उल्हासनगर शहर उभे राहिले. मात्र, शहराच्या विकासाचा इतिहास आणि पायाभरणीचा संघर्ष आज विस्मृतीत जात असल्याची खंत असरोडकर यांनी व्यक्त केली. निर्वासितांनी प्रतिकूल परिस्थितीत उभे केलेल्या या शहराचा इतिहास जतन करणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले.
महापालिका मुख्यालयाच्या मागील भागात पूर्वी जलतरण तलाव होता. नागरिकांना जलतरणाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या जागेच्या खासगीकरणामागील मूळ उद्देश होता. मात्र, कालांतराने या उद्देशाला हरताळ फासला गेला असून, त्या जागेचा वापर अन्य कारणांसाठी होत असल्याचा आरोप असरोडकर यांनी केला.
“जलतरण तलावाच्या जागेचे खासगीकरण तातडीने थांबवून ती जागा उल्हासनगर महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घ्यावी. त्या ठिकाणी निर्वासितांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि शहर उभारणीच्या इतिहासाचा वारसा जतन करणारे संग्रहालय उभारावे,” अशी मागणी त्यांनी केली.
उल्हासनगरच्या इतिहासात निर्वासितांच्या पुनर्वसनाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शहराचा इतिहास केवळ कागदोपत्री न राहता तो संग्रहालयाच्या माध्यमातून नागरिक आणि नव्या पिढीसमोर जिवंत स्वरूपात मांडला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
असरोडकर यांनी नागरिकांना शहराच्या विकासाच्या नावाखाली होणाऱ्या निर्णयांकडे सजगपणे पाहण्याचे आवाहन केले. “लोकप्रतिनिधींवरच अवलंबून न राहता सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या शहराच्या वारशासाठी आवाज उठवला पाहिजे. नागरिक हाच खरा विरोधी पक्ष आहे,” असे त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times