वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

ठाण्यात म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार; ५२ लाखांचे घर आता ४४ लाखांत

  • by
  • Aug 11, 2026

ठाणे : ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील सदनिकांच्या किमती कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार निश्चित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे सध्या ५१ ते ५२ लाख रुपयांपर्यंत पोहोचलेल्या घरांची किंमत सुमारे ४४ लाख रुपये होण्याची शक्यता आहे.

चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पात एकूण १,१७३ सदनिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी ९३८ सदनिकांची सोडत १४ जुलै २०१७ रोजी काढण्यात आली होती. मात्र, उर्वरित सदनिकांसाठी २०२५-२६ च्या रेडी रेकनर दरानुसार किंमत निश्चित करण्यात आल्याने काही सदनिकांच्या किमती ५१ ते ५२ लाख रुपयांपर्यंत वाढल्या.

या दरवाढीमुळे एकाच गृहप्रकल्पातील आणि समान आकाराच्या सदनिकांसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याचा मुद्दा लाभार्थ्यांनी उपस्थित केला. त्यामुळे दरांमध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत पूर्वीच्या सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उर्वरित सदनिकांसाठी २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार नव्याने सोडत काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सदनिकांना २०२०-२१ मध्ये अंशतः भोगवटा प्रमाणपत्र मिळाले होते. त्यावेळी प्रति चौरस फूट सुमारे १० हजार रुपये दराने सदनिकांची किंमत निश्चित करण्यात आली होती, ज्यामुळे घरांची किंमत सुमारे ४४ लाख रुपये होती. त्यानंतर पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने नव्या रेडी रेकनर दरानुसार घरांच्या किमती वाढवण्यात आल्या.

या निर्णयामुळे समान प्रकल्पातील सदनिकांच्या किमतीतील तफावत दूर होण्यास मदत होणार असून, उर्वरित घरांच्या इच्छुक लाभार्थ्यांना तुलनेने कमी दरात घर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बैठकीला म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड यांच्यासह म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि तक्रार दाखल करणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट