सानपाडा - पामबीच विभागातील सुसंस्कृत व सामाजिक वातावरण कलुषित करू नका
- by
- Aug 22, 2026
सानपाडा - पामबीच विभागातील सुसंस्कृत व सामाजिक वातावरण कलुषित करू नका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरसेवक निशांत भगत यांची प्रत्यक्ष निवेदन सादर करून मागणी.
नवी मुंबईतील पामबीच रोडला समांतर असलेल्या सानपाडा (सेक्टर १७) येथील ‘द अफेअर्स सीएचएस’ इमारतीत प्रस्तावित असलेल्या ‘मे. हौसा रेस्टॉरंट’ (बार अँड रेस्टॉरंट / आर्केस्ट्रा बार) च्या परवान्याला लोकप्रतिनिधी आणि सर्व स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे याबाबतीत आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि यासंदर्भातील निवेदन सादर करून सानपाडावासीयांच्या भावना स्थानिक नगरसेवक निशांत करसन भगत यांनी मांडल्या.
आज रोजी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राद्वारे शासनाकडे मांडलेल्या प्रमुख मुद्दे आणि हरकती:
* शासकीय धोरण: राज्य सरकारच्या २७ जुलै २०२६ च्या परिपत्रकानुसार नवीन ऑर्केस्ट्रा बार परवाने न देणे आणि जुन्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे स्पष्ट धोरण आहे.
* नागरिकांची सुरक्षितता: या इमारतीत ‘ॲडव्हान्स आय हॉस्पिटल’ आहे. तसेच अवघ्या २०० मीटरच्या परिघात जयपुरीयार शाळा आणि परिसरातील नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आहे. येथे ऑर्केस्ट्रा / डान्स बार सुरू झाल्यास महिला, विद्यार्थ्यांच्या आणि रुग्ण यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.
* जनतेचा तीव्र विरोध: या परवान्याविरोधात परिसरातील ५०० हून अधिक नागरिक आणि गृहनिर्माण सोसायट्यांनी लेखी हरकती नोंदविल्या आहेत.
सानपाडा - पामबीच परिसरातील राखलेले सुसंस्कृत वातावरण, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू देणार नाही. स्थानिक रहिवाशांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील अशी प्रतिक्रिया नगरसेवक निशांत भगत यांनी व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble