When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

सानपाडा - पामबीच विभागातील सुसंस्कृत व सामाजिक वातावरण कलुषित करू नका

  • by
  • Aug 22, 2026

सानपाडा - पामबीच विभागातील सुसंस्कृत व सामाजिक वातावरण कलुषित  करू नका 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरसेवक निशांत भगत यांची प्रत्यक्ष निवेदन सादर करून मागणी.

नवी मुंबईतील पामबीच रोडला समांतर असलेल्या सानपाडा (सेक्टर १७) येथील ‘द अफेअर्स सीएचएस’ इमारतीत प्रस्तावित असलेल्या ‘मे. हौसा रेस्टॉरंट’ (बार अँड रेस्टॉरंट / आर्केस्ट्रा बार) च्या परवान्याला लोकप्रतिनिधी आणि सर्व स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे याबाबतीत आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक  यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि यासंदर्भातील निवेदन सादर करून सानपाडावासीयांच्या भावना स्थानिक नगरसेवक निशांत करसन भगत यांनी मांडल्या.

आज रोजी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राद्वारे शासनाकडे मांडलेल्या प्रमुख मुद्दे आणि हरकती:

* शासकीय धोरण: राज्य सरकारच्या २७ जुलै २०२६ च्या परिपत्रकानुसार नवीन ऑर्केस्ट्रा बार परवाने न देणे आणि जुन्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे स्पष्ट धोरण आहे.

* नागरिकांची सुरक्षितता: या इमारतीत ‘ॲडव्हान्स आय हॉस्पिटल’ आहे. तसेच अवघ्या २०० मीटरच्या परिघात जयपुरीयार शाळा आणि परिसरातील नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आहे. येथे ऑर्केस्ट्रा / डान्स बार सुरू झाल्यास महिला, विद्यार्थ्यांच्या आणि रुग्ण यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.

* जनतेचा तीव्र विरोध: या परवान्याविरोधात परिसरातील ५०० हून अधिक नागरिक आणि गृहनिर्माण सोसायट्यांनी लेखी हरकती नोंदविल्या आहेत.

सानपाडा - पामबीच परिसरातील राखलेले सुसंस्कृत वातावरण, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू देणार नाही. स्थानिक रहिवाशांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील अशी प्रतिक्रिया नगरसेवक निशांत भगत यांनी व्यक्त केली.

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble (sub editor)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट