ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात कोल्हापूरचा प्रविण कांबळे आणि महिला गटात नाशिकची रविना गायकवाड ठरले विजेते
- by
- Aug 30, 2026
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात कोल्हापूरचा प्रविण कांबळे आणि महिला गटात नाशिकची रविना गायकवाड ठरले विजेते
- 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला मॅरेथॉनमधील धावण्याचा आनंद
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण
- ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांनी केले आयोजन
ठाणे (30) : धाव प्रगतीची.. गतीशील ठाण्याची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या 32 व्या ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरचा प्रविण कांबळे याने अव्वल स्थान पटकावले. त्याने 01 तास 07 मिनिटे आणि 21 सेकंद वेळेसह 21 किमीचे अंतर पार केले. तर, महिला गटात नाशिकची रविना गायकवाड यांनी 01 तास 26 मिनिटे आणि 04 सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे 30 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले.
सहा वर्षानंतर ठाणे महानगरपालिकेत महापौर, पदाधिकारी व नगरसेवक विराजमान झाल्यानंतरची ही 32 ची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात पार पडली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला.
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 32 व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण 14 गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, महापालिका आयुक्त सौरभ राव, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सभापती मीनल संख्ये, उथळसर प्रभाग समिती सभापती नारायण पवार, वर्तकनगर प्रभाग समिती सभापती जयश्री डेव्हिड, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती सभापती निर्मला कणसे, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती सिध्दार्थ ओवळेकर, वागळे प्रभाग समिती सभापती एकता भोईर, कळवा प्रभाग समिती सभापती विजया लासे, दिवा प्रभाग समिती दिपक जाधव, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक राजेश मोरे, मनोज शिंदे, विकास रेपाळे, दिपक वेतकर, संजय वाघुले, सुधीर कोकाटे, राजेंद्र फाटक, विक्रांत वायचळ, बाबाजी पाटील, शहाजी खुस्पे, सिध्दार्थ पांडे नगरसेविका मीनाक्षी शिंदे, नम्रता भोसले, सुखदा मोरे, प्रमिला केणी, अॅङ अनिता गौरी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, प्रियांका पाटील, अर्चना पाटील, दिपाली भगत, चंद्रकांता साळवी, सहर शेख, मनिषा कांबळे, स्नेहा पाटील, दर्शना म्हात्रे, नंदा पाटील, अपर्णा साळवी, माधुरी मेटांगे, विमल भोईर, वर्षा शेलार, संध्या मोरे, यज्ञा भोईर, माजी महापौर संजय मोरे, माजी उपमहापौर मनोज लासे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, उपायुक्त दिनेश तायडे, दिपक झिंजाड, मिताली संचेती, क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, आदी उपस्थित होते.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला 32 वर्षाचा इतिहास
या वर्षी पुन्हा ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. गेली 32 वर्षे या मॅरेथानला झाली आहे, या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे स्व.माजी खासदार सतीश प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितले. 32 वर्षाचा इतिहास या मॅरेथॉनला आहे. ठाणे बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही उर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करत आहे. म्हणूनच 'धाव ठाण्याची…गतीशील ठाण्याची’असे घोषवाक्य घेतले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू नीलेश कुलकर्णी यांनी कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु 32 वर्षाचा हा इतिहास विस्तृत स्वरुपात जतन करण्याची सूचना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. ठाणे जिल्हयातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना ऑल्पिम्पिकमध्ये कसे सहभागी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करा, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.
खेळाडूंचा सत्कार
जागतिक स्तरावरील 38 व्या चिन्मय स्विम मॅरेथॉन 2026 झुरिच लेक, स्विर्त्झलंड येथील स्पर्धेत रिले पध्दतीने झुरिच लेक हे 26 किती अंतर 8 तास 7 मिनिटांत पूर्ण करणाऱ्या आयुषी कैलास आखाडे, समीप्ता गणेश वाव्हळ, सुयश प्रियंका हिंदळेकर, प्रशिक्षक कैलास आखाडे, जलतरण प्रकारात श्री शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या उदय उमेश उतेकर, ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी दरवर्षी योगदान देणारे रमेश खारकर, पंच म्हणून काम पाहणारे सुनील होनमाने, संतोष वायगणकर यांचा तसेच UPSC-CDS परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय नौदलात (Executive Branch) मध्ये वर्ग-१ अधिकारी म्हणून निवड झालेल्या ज्ञानेश आव्हाड यांचाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कॉर्पोरेट रन
महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक कि.मी ची 'कॉर्पोरेट रन' ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचबरोबर, दिव्यांगांच्या त्रिदल समुहानेही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला.
सिनेकलाकारही धावले
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेस सिनेकलावंत मंगेश देसाई, गश्मीर महाजनी किशारी आंबिये, ऐश्वर्या नारकर, अभिज्ञा भावे, हरिश थोरात, स्वराज नागांवकर, शिवानी सोनार, विजया बाबर, निखिल दामले, रोहित परशुराम, ट्विंकल यादव, दक्षता जुईल, अनुज साळुंखे, प्रतिक्षा शिवणकर, तनुष्का विशेल, चेतन गौरव, समीर परांजपे, अनघा ठाकूर उपस्थित होते. कलाकारांनी देखील स्पर्धकांचा उत्साह वाढवत एक कि.मी स्पर्धेत सहभाग घेतला.
एकूण 11 लाखांची बक्षिसे
ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध 14 गटात झाली. विजेत्यांना 11 लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. २१ कि.मी स्पर्धेतील विजेत्यास एक लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
पुरुष खुला गट - अंतर २१ किमी
१. प्रविण कांबळे, कोल्हापूर
२. राजन विक्रमजीत यादव, पुणे
३. कालिदास हिरवे, नाशिक
४. अमित पाटील
५. तन्मय पवार
६. पराजीत गायकवाड
७. रुपनेर चैतन्य
८. राज तिवारी
९. अंकुश हक्के
१०. कमलाकर देशमुख
महिला खुला गट - अंतर २१ किमी
१. रविना गायकवाड, नाशिक
२. तेजस्विनी नरेंद्र लामकाने
३. साक्षी कसबे, पुणे
४. आचल कडुकर
५. यामिनी ठाकरे
६. साक्षी पवार
७. मनिषा पवार
८. अर्चना शेप
९. पायल विश्वकर्मा
१०. रुख्मिणी भोर
पुरुष, १८ वर्षावरील, १० किमी
१. अभिनंदन सुर्यवंशी
२. अतुल
३. सोहम शिंदे
४. करिहरपाल कार्तिक कुमार
५. दाजी हुबले
६. ईश्वर झिरवाळ
७. अजय पाल
८. पुंडलिक गवळी
९. विशाल बनसोडे
१०. रोशन रहाटे
महिला, १६ वर्षावरील, १० किमी
१. तृप्ती नागरकर
२. प्रतिक्षा राज
३. गौरी राऊत
४. प्रिया भोर
५. सुजाता मुंडेकर
६. श्वेता गावडे
७. विश्वेश्वरी न्हावी
८. दिशा वाघ
९. स्वरुपा पाटील
१०. डॉ. संजना पाटील
मुले, १८ वर्षाखालील, १० किमी
१. विवेककुमार शाह, जे.एस. डब्ल्यू स्पोटर्स, वासिंद
२. पवन गौड, इंदिरा गांधी स्कूल, ठाणे
३. प्रियांशु आत्माराम जैसवाल, जे.एस.डब्ल्यू स्पोटर्स, वासिंद
४. रोहित संगा पॉल, साकेत कॉलेज, कल्याण
५. आदित्य ध्रुवराज यादव, ठाकूर कॉलेज, कांदिवली
६. प्रिस रामसरन जैसवार, आर.जे. ठाकूर, ठाणे
७. अुनप संजय प्रजापती, सी.एच.कॉलेज, उल्हासनगर
८. आदित्य शामसुंदर प्रजापती, सतिश प्रधान ज्ञानसाधन कॉलेज, ठाणे
९. कृष्णा किशोर जाधव, अभिनव ज्ञानमंदिर कॉलेज, कर्जत
१०. अभिषेक अमरजित यादव, बी.एन. कॉलेज, भिवंडी
मुले, १५ वर्षाखालील, ०५ किमी
१. अयान वि. पिंजारी, रेम्बो स्पोटर्स ॲकॅडमी, अंबरनाथ
२. विनायक विजय यादव, कु.ब.न.प. शाळा क्र. 15 एरंजाड
३. युवराज तरणे, जे.एस.डब्ल्यु स्पोटर्स, वाशिंद
४. सुयश भीमा हेमाडे, कु.ब.न.प.शाळा क्र. 15 एरंजाड
५. अमन गोपाल गुप्ता, न.मु.म.पा.शाळा क्र. 104
६. शशांक न. उपाध्ये, रेम्बो स्पोटर्स अकॅडमी
७. कयान दिपक चौहान, राजे स्पोटर्स ॲकॅडमी, बदलापूर
८. प्रशांत विजय राणे, कु.ब.न.प. शाळा क्र. 15 एरंजाड
९. महाकेश पाल, रेम्बो स्पोटर्स अकॅडमी, अंबरनाथ
१०. आराध्य सुहास पाटील, सेव्हन स्टार स्पोटर्स अकादमी
मुली, १५ वर्षाखालील, ०५ किमी
1. करिश्मा अशोक राणे, कु.ब.न.प शाळा क्र. 15, बदलापूर
2. वंदना ठाकूर, जे.एस.डब्ल्यू, वाशिम
3. समीक्षा रोहिदास भोपी, कु.ब.न.प शाळा, बदलापूर
4. अक्षरा किरण पाटील, सेवा संयो
5. क्तैया ओझा, जे.एस. स्पोटर्स
6. जान्वी संतोष शेलार, कु.ब.न.प शाळा, बदलापूर
7. ईशा चंद्रकांत चव्हाण, कु.ब.न.प शाळा, बदलापूर
8. धनक्ती शशिकांत पष्टे, कु.ब.न.प शाळा, बदलापूर
9. भुमिका रमेश चव्हाण, कु.ब.न.प शाळा, बदलापूर
10. अल्पीता शंकर चव्हाण, कु.ब.न.प शाळा, बदलापूर
मुले, १२ वर्षाखालील, ०३ किमी
१. तेजप्रताप कुमार यादव, मध्य रेल्वे उच्चतर माध्य. विद्यालय कल्याण
२. रिदम निखिल साहिल, राजे स्पोटर्स
३. रोनक मंगेश आगळे, कु.ब.न.प शाळा 15, एरंजाड
४. तेजीतकुमार कमलेशकुमार यादव, सेंट्रल रेल्वे
५. रुद्र रणजीत सिंग, अंबरनाथ कला क्रीडा भारती अंबरनाथ
६. वेद विवेकप्रकाश गुप्ता, मध्य रेल्वे उच्चतर माध्यमिक विद्यालय कल्याण
७. क्षितीज बाबुरात कोरवी, रन होलीस
८. आयान नरेंद्र पांडे, रीमो स्पोम
९. रुद्र ओमप्रकाश यादव, राजे स्पोटर्स
१०. ऋतुराज वाल्मिक सोनावणे, डॉन बॉस्को स्कूल कल्याण
मुली, १२ वर्षाखालील, ०३ किमी
१. रिध्दी राजन देशमुख, राजे स्पोर्टस ॲकडमी बदलापूर
२. गार्गी मनोज भोईर, मोहिंदरसिंग काबलसिंग हायस्कुल
३. कितिका किशोर सावंत, राजे स्पोर्टस ॲकडमी बदलापूर
४. काव्या रोशन देशमुख, राजे स्पोर्टस ॲकडमी बदलापूर
५. सिध्दी राजन देशमुख , राजे स्पोर्टस ॲकडमी बदलापूर
६. आहाना सुरेश निरंकार, रेन्बो स्पोर्टस अकॅडमी
७. श्रावणी दिनेश शेलार, जे. एस.डब्ल्यू स्पोटर्स
८. अनन्या राजेशकुमार प्रसाद, रेम्बो स्पोटर्स अकॅडमी
९. रिया हेमंत गोसावी, अंबरनाथ कला क्रीडा भारती, अंबरनाथ
१०. अनन्या राजेशकुमार प्रसाद, अंबरनाथ कला क्रीडा भारती, अंबरनाथ
पुरुष - ६० वर्षांवरील, ०१ किमी
१. प्रभाकर यमनाजी डुंबरे
२. विष्णुदास रामभाऊ आवटे
३. सुधाकर परशुराम शिंदे
४. वाल्मिक सदोबा मांढरे
५. एकनाथ रघुनाथ पाटील
महिला - ६० वर्षांवरील, ०१ किमी
१. आशा किशोर पाटील
२. पुर्णिदेवी रमेश शर्मा
३. रेखा विलास ताम्हाणेकर
४. अंजली प्रदीप पांडे
५. उर्मिला दत्तात्रय तवटे
ठाणे महानगरपालिका कर्मचारी वर्ग 3 कि.मी (पुरूष)
1. राजेंद्र प्रल्हाद नांगरे (TDRF जवान)
2. गणेश भोये
3. तुषार दवणे
4. तानाजी भरसट
5. अंकुश पवार
ठाणे महानगरपालिका कर्मचारी वर्ग 3 कि.मी (महिला)
1. अंकिता मोरे
2. स्मिता काजळे
3. प्रिती राठोड
4. स्मिता महाजन
5. संध्या पांडे
कॉर्पोरेट रन, अंतर ०१ किमी
१. मारुती राजू लांडे
२. कुणाल विक्रांत भोईटे
३. दिलीप शांताराम शिंदे
४. सौरभ राजीव डाके
५. निखिल मनोहर चव्हाण
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble