When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

कौशल्याच्या बळावर स्वप्नांना दिली यशाची उभारीकौशल्याच्या बळावर स्वप्नांना दिली यशाची उभारी

  • by
  • Oct 01, 2026

मुरबाडच्या वेदिका सुरोशी यांचा प्रेरणादायी उद्योगप्रवास

​केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेने ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणींच्या पंखांना नवे बळ दिले आहे. याचेच एक जितेजागते उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खेवरे येथील कु. वेदिका विकास सुरोशी. केवळ पदवीधर असून नोकरीच्या मागे न धावता, आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वतःचा मसाला आणि पापड निर्मितीचा व्यवसाय यशस्वीपणे उभा करून त्यांनी आजच्या तरुण पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.


​वेदिका यांचा प्रवास सोपा नव्हता. शेतीवर आधारित उपजीविका असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या वेदिका यांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी ठोस करण्याची ओढ होती. हीच ओढ त्यांना 'महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे पर्यंत (RSETI) घेऊन गेली. शासनाच्या उद्योजकता जागरूकता कार्यक्रमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये 'पापड, लोणचे व मसाला पावडर बनविणे' या विशेष प्रशिक्षणात सहभाग घेतला. केवळ १० दिवसांच्या या प्रशिक्षणाने त्यांच्यातील सुप्त उद्योजिकेला जागृत केले. प्रशिक्षणादरम्यान मिळालेले उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे धडे त्यांच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरले.

​प्रशिक्षण पूर्ण होताच, वेळ न घालवता वेदिका यांनी स्वतःच्या ५० हजार रुपयांच्या भांडवलातून मसाला ग्राइंडिंग युनिटची स्थापना केली. घरगुती चव आणि उच्च दर्जाची गुणवत्ता या जोरावर अल्पावधीतच त्यांच्या मसाला आणि पापड उत्पादनांनी स्थानिक बाजारपेठेत आपली ओळख निर्माण केली. ग्राहकांचा वाढता विश्वास हीच त्यांच्या व्यवसायाची खरी संपत्ती ठरली. आज या व्यवसायातून त्यांना दरमहा सुमारे १५ हजार रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळत असून, त्या खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाल्या आहेत.

​वेदिका यांच्या या यशामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत. कधीकाळी मर्यादित उत्पन्नावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब आज त्यांच्या या उद्योगामुळे सावरले आहे. 'कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नांना यशाचा आकार देता येतो,' हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. केवळ स्वतःपुरता मर्यादित विचार न करता, भविष्यात आपल्या व्यवसायाचा विस्तार करून इतर ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे उदात्त उद्दिष्ट आहे.

​शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेचा योग्य लाभ घेऊन स्वबळावर उभ्या राहिलेल्या वेदिका सुरोशी यांची ही यशकथा आज जिल्ह्यातील अनेक महिलांसाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक दीपस्तंभ ठरत आहे. त्यांच्या या जिद्दीचे आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रिपोर्टर

  • Anoop chandrakant chavan
    Anoop chandrakant chavan (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Anoop chandrakant chavan

संबंधित पोस्ट