महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीतील अडचणी दूर करा! कातकरी आदिवासी वाड्यांतील महिलांची मागणी; महिला किसान दिनानिमित्त जनजागृती
- by
- Oct 15, 2026
महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीतील अडचणी दूर करा!
कातकरी आदिवासी वाड्यांतील महिलांची मागणी; महिला किसान दिनानिमित्त जनजागृती
पेण : महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून अधिकृत व कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, राज्यभरात लाखो अर्ज दाखल होत असताना दुर्गम आदिवासी वाड्यांतील कातकरी महिलांना ऑनलाइन नोंदणीसाठी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी प्रक्रिया सुलभ करून वाड्यांमध्ये प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आदिवासी महिला शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राज्यभरातून ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन ६८ हजार ४३६ महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले होते. म्हणजेच, अर्जांची संख्या मोठी असली तरी प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. ही आकडेवारी ७ ऑक्टोबरपर्यंतची असून त्यानंतरच्या अर्जांची अद्ययावत संख्या उपलब्ध नसल्याने ती येथे नमूद केलेली नाही.
पेण तालुक्यातील बेलवडे हद्दीतील कातकरी आदिवासी मालवाडी येथे १५ ऑक्टोबर रोजी महिला शेतकरी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन अंकुर ट्रस्ट,मकाम आणि इएसपी मार्फत आयोजन करण्यात आले होते. मालवाडी येथे महिलांसह दवणसर, रामराज, बारीचीवाडी, बेंदीचीवाडी, माळेवाडी आणि तागाचीवाडी येथील शेतीकाम करणाऱ्या महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या. महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची अधिकृत नोंद व्हावी आणि त्यांना प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया समजावी, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
नेटवर्क, मोबाईल आणि आधार संलग्नतेचा अडथळा
कातकरी आदिवासी वाड्यांमध्ये इंटरनेट नेटवर्कची कमतरता, आधारकार्डला मोबाईल क्रमांक संलग्न नसणे, स्वतःचा मोबाईल नसणे आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहितीचा अभाव यांमुळे महिलांना नोंदणी करणे कठीण जात आहे. शेतीत प्रत्यक्ष राबणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठीही इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे.
या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक दुर्गम वाडीत विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करावीत, आधार व मोबाईल संलग्नतेसाठी मदत द्यावी, अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि ग्रामपंचायत व कृषी विभागाने समन्वयाने काम करावे, अशी मागणी आदिम कातकरी महिलांनी केली.
“शेतीत राबणाऱ्या महिलेची ओळख कागदपत्रांअभावी नाकारली जाऊ नये”
असंघटित कामगार शेतकरी महिला युनियनच्या डॉ. वैशाली पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधताना सांगितले की, “कातकरी आदिवासी महिला पहाटेपासून शेतात राबतात. पेरणी, खुरपणी, कापणी, पशुपालन आणि शेतीपूरक कामांमध्ये त्यांचे मोठे योगदान असते. मात्र, अनेकदा जमिनीच्या नोंदीत त्यांचे नाव नसते, स्वतःचा मोबाईल नसतो आणि वाडीत नेटवर्कही मिळत नाही. अशा मAddहिलांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही म्हणून त्यांची शेतकरी म्हणून ओळख व हक्क नाकारले जाता कामा नयेत. शेतीत राबणाऱ्या महिलेचा हक्क तिच्या श्रमातून निर्माण होतो; तिच्याकडे स्मार्टफोन आहे की नाही किंवा सातबाऱ्यावर तिचे नाव आहे की नाही, यावर तिच्या श्रमाची किंमत ठरता कामा नये. शासनाने दुर्गम आदिवासी वाड्यांपर्यंत पोहोचून नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरणाची व्यवस्था करावी.”
आदिवासी नेत्या ज्योती नाईक आणि अंजली वाघमारे यांनीही आदिवासी महिलांपर्यंत योजनांची माहिती, अर्ज भरण्यासाठी मदत आणि प्रमाणपत्र मिळेपर्यंत आवश्यक मार्गदर्शन पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली.
असंघटित कामगार शेतकरी महिला युनियनच्या डॉ. वैशाली पाटील तसेच अंकुर ट्रस्टच्या कार्यकर्त्या नीरा वीर आणि मिनल सांडे यांच्या सहकार्याने हा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. ग्रामीण व आदिवासी भागातील महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळावी आणि त्यांना पात्रतेनुसार शासकीय कृषी योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी नोंदणीपासून प्रमाणपत्र वितरणापर्यंत प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून देण्याची गरज या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली.
महिला शेतकरी प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?
१. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलला भेट द्या.
२. ‘प्रमाणपत्र डाउनलोड करा’ हा पर्याय निवडा.
३. पावती क्रमांकाद्वारे प्रमाणपत्र मिळविण्याचा पर्याय निवडा.
४. अर्ज करताना मिळालेला पावती क्रमांक भरा.
५. ‘प्रमाणपत्र मिळवा’ या पर्यायावर क्लिक करा.
६. प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते स्क्रीनवर दिसेल.
७. ‘डाउनलोड करा’ या पर्यायावर क्लिक करून प्रमाणपत्र मोबाईलमध्ये जतन करा.
प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अर्जाची स्थिती तपासावी आणि आवश्यकतेनुसार ग्रामपंचायत किंवा संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज भरणे, तांत्रिक अडचणी दूर करणे आणि प्रमाणपत्र मिळविणे या सर्व टप्प्यांवर दुर्गम भागातील महिलांना सहाय्य मिळणे आवश्यक आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
मंत्री मा.ना. छगनराव भुजबळ
- जन्मदिन
- October 15
Hema Malini
- जन्मदिन
- October 16
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav