श्रीवर्धनच्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे वेळेवर सुरू करण्याची नागरिकांची मागणी
- by
- Oct 15, 2026
क्लासेस व कराटे क्लासवरून परतणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना अंधाराचा त्रास
श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरातील मुख्य रस्त्यावरील विद्युत पथदिवे सायंकाळी काळोख पडल्या नंतरही वेळेवर सुरू होत नसल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मुख्य रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले शाळा, खासगी क्लासेस आणि कराटे क्लासेस आटोपून घरी जात असतात. सध्या थंडीचे दिवस चालु होत आहेत.सायंकाळी लवकर अंधार पडतो. त्यामुळे पथदिवे बंद असताना विद्यार्थ्यांना अंधारातून प्रवास करावा लागतो.
या अंधारामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या कडेला झाडी-झुडपे असल्याने साप बाहेर येण्याची भीती आहे. तसेच मागील काळात या परिसरात मुलींची छेड काढण्याचे प्रकार घडले असल्याने, अंधाराचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी श्रीवर्धन शहरातील पथदिवे सायंकाळी काळोख पडण्यापूर्वीच नियमितपणे सुरू करावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी जाता येईल, अशी विनंती नागरिकांमधून करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
मंत्री मा.ना. छगनराव भुजबळ
- जन्मदिन
- October 15
Hema Malini
- जन्मदिन
- October 16
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times