स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांची कल्पकता लक्षवेधी; अवघ्या महिनाभरात विकसित केलेल्या ॲपचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांची कल्पकता लक्षवेधी; अवघ्या महिनाभरात विकसित केलेल्या ॲपचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

  • by
  • Oct 16, 2026

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान कौशल्याने मुख्यमंत्री फडणवीस प्रभावित

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेले ॲप, त्यामागील कल्पकता आणि तंत्रज्ञानावरील त्यांची पकड पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या निमित्ताने दादर येथील भवानी शंकर सीबीएसई महापालिका शाळेत स्नेह आशा फाउंडेशनने उभारलेल्या डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान एका विद्यार्थ्याने स्वतः विकसित केलेले ॲप मुख्यमंत्र्यांना दाखवले. ते पाहून त्यांनी सहज विचारले, “हे तयार करायला किती दिवस लागले?” विद्यार्थ्याने “एक महिना” असे सांगताच मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले. इतक्या कमी वेळात ॲप विकसित केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्याचे विशेष कौतुक केले. प्रयोगशाळेतील इतर विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला, त्यांचे प्रकल्प समजून घेतले आणि “कर लो दुनिया मुट्ठी में” असा संदेश देत तंत्रज्ञानाच्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.


विद्यार्थ्यांनी विकसित केलेली ॲप्स ठरली लक्षवेधी

डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विविध उपयुक्त ॲप्स विकसित केली आहेत. यामध्ये ‘टेरा ३डी’ (Terra 3D) या ॲपच्या माध्यमातून पृथ्वीचे आभासी पद्धतीने अन्वेषण करता येते, तसेच जगातील विविध देशांची माहिती जाणून घेता येते. ‘एफ.आर.आय.डी.ए.वाय.’ (F.R.I.D.A.Y.) हे ॲप संगणकावरील विविध कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सुलभ करण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. तर ‘सीरियल’ (Cereal) हे ॲप कार्यालयीन बैठकांमध्ये मदत करण्यासाठी आणि ध्वनिमुद्रणासाठी विकसित करण्यात आले आहे.

या तीनही ॲप्सच्या निर्मितीमध्ये यशराज जाधव, आर्यमान जाधव, समीक्षा कोंथम, अक्षरा बांगर, नील बद्री, अंश पाटील आणि आरुष वंगारी या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देत विकसित केलेले हे प्रकल्प त्यांच्या सर्जनशीलतेची, कल्पकतेची आणि डिजिटल कौशल्यांची ओळख करून देणारे ठरले. या प्रसंगी स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा सिद्धी चौहान जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता उपक्रमांतर्गत महापालिका व सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक शिक्षणासोबत प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.


“संधी मिळाली तर महापालिका शाळांमधील मुलेही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकतात, हे विद्यार्थ्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. संगणक शिकणे ही केवळ सुरुवात आहे. त्यापुढे जाऊन मुलांनी स्वतःच्या कल्पनांना आकार द्यावा, नवे प्रयोग करावेत आणि आत्मविश्वासाने पुढे यावे, हा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केल्याने त्यांचा उत्साह निश्चितच वाढला आहे,” असे सिद्धी चौहान जयस्वाल यांनी सांगितले.

स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर, कल्पक विचार आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो.  डिजिटल शिक्षणाच्या संधी मर्यादित असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाधारित संधींसाठी सक्षम करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

स्नेह आशा फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचा लाभ आतापर्यंत १६,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे. डिजिटल साक्षरता, शिष्यवृत्ती, आर्थिक साक्षरता, जीवनोपयोगी कौशल्ये आणि करिअर मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत संस्था कार्यरत आहे. पालघर जिल्ह्यात नुकताच सुरू करण्यात आलेला ‘जीवन कौशल्य’ उपक्रमही याच प्रयत्नांचा एक भाग आहे.


स्नेह आशा फाउंडेशनविषयी

सिद्धी जयस्वाल आणि स्नेहा जयस्वाल यांनी स्थापन केलेली स्नेह आशा फाउंडेशन ही मुंबईस्थित ना-नफा तत्त्वावर कार्यरत संस्था आहे. वंचित घटकांतील मुलांना शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्यविकासाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवते.



रिपोर्टर

  • Anoop chandrakant chavan
    Anoop chandrakant chavan (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Anoop chandrakant chavan

संबंधित पोस्ट