स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांची कल्पकता लक्षवेधी; अवघ्या महिनाभरात विकसित केलेल्या ॲपचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
- by
- Oct 16, 2026
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान कौशल्याने मुख्यमंत्री फडणवीस प्रभावित
मुंबई, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेले ॲप, त्यामागील कल्पकता आणि तंत्रज्ञानावरील त्यांची पकड पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या निमित्ताने दादर येथील भवानी शंकर सीबीएसई महापालिका शाळेत स्नेह आशा फाउंडेशनने उभारलेल्या डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
या भेटीदरम्यान एका विद्यार्थ्याने स्वतः विकसित केलेले ॲप मुख्यमंत्र्यांना दाखवले. ते पाहून त्यांनी सहज विचारले, “हे तयार करायला किती दिवस लागले?” विद्यार्थ्याने “एक महिना” असे सांगताच मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले. इतक्या कमी वेळात ॲप विकसित केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्याचे विशेष कौतुक केले. प्रयोगशाळेतील इतर विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला, त्यांचे प्रकल्प समजून घेतले आणि “कर लो दुनिया मुट्ठी में” असा संदेश देत तंत्रज्ञानाच्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांनी विकसित केलेली ॲप्स ठरली लक्षवेधी
डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विविध उपयुक्त ॲप्स विकसित केली आहेत. यामध्ये ‘टेरा ३डी’ (Terra 3D) या ॲपच्या माध्यमातून पृथ्वीचे आभासी पद्धतीने अन्वेषण करता येते, तसेच जगातील विविध देशांची माहिती जाणून घेता येते. ‘एफ.आर.आय.डी.ए.वाय.’ (F.R.I.D.A.Y.) हे ॲप संगणकावरील विविध कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सुलभ करण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. तर ‘सीरियल’ (Cereal) हे ॲप कार्यालयीन बैठकांमध्ये मदत करण्यासाठी आणि ध्वनिमुद्रणासाठी विकसित करण्यात आले आहे.
या तीनही ॲप्सच्या निर्मितीमध्ये यशराज जाधव, आर्यमान जाधव, समीक्षा कोंथम, अक्षरा बांगर, नील बद्री, अंश पाटील आणि आरुष वंगारी या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देत विकसित केलेले हे प्रकल्प त्यांच्या सर्जनशीलतेची, कल्पकतेची आणि डिजिटल कौशल्यांची ओळख करून देणारे ठरले. या प्रसंगी स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा सिद्धी चौहान जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता उपक्रमांतर्गत महापालिका व सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक शिक्षणासोबत प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
“संधी मिळाली तर महापालिका शाळांमधील मुलेही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकतात, हे विद्यार्थ्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. संगणक शिकणे ही केवळ सुरुवात आहे. त्यापुढे जाऊन मुलांनी स्वतःच्या कल्पनांना आकार द्यावा, नवे प्रयोग करावेत आणि आत्मविश्वासाने पुढे यावे, हा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केल्याने त्यांचा उत्साह निश्चितच वाढला आहे,” असे सिद्धी चौहान जयस्वाल यांनी सांगितले.
स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर, कल्पक विचार आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. डिजिटल शिक्षणाच्या संधी मर्यादित असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाधारित संधींसाठी सक्षम करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
स्नेह आशा फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचा लाभ आतापर्यंत १६,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे. डिजिटल साक्षरता, शिष्यवृत्ती, आर्थिक साक्षरता, जीवनोपयोगी कौशल्ये आणि करिअर मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत संस्था कार्यरत आहे. पालघर जिल्ह्यात नुकताच सुरू करण्यात आलेला ‘जीवन कौशल्य’ उपक्रमही याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
स्नेह आशा फाउंडेशनविषयी
सिद्धी जयस्वाल आणि स्नेहा जयस्वाल यांनी स्थापन केलेली स्नेह आशा फाउंडेशन ही मुंबईस्थित ना-नफा तत्त्वावर कार्यरत संस्था आहे. वंचित घटकांतील मुलांना शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्यविकासाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवते.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Hema Malini
- जन्मदिन
- October 16
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Anoop chandrakant chavan