रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले चंडिका देवी चरणी नतमस्तक.
- by
- Oct 17, 2026
बाईक रॅलीने शिवसैनिकांत जोश.
रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या तळा शहर भेटीने संपूर्ण शहर भगवेमय झाले. पालकमंत्री गोगावले यांनी सर्वप्रथम तळा शहराची ग्रामदेवता श्री चंडिका देवीचे मनोभावे दर्शन घेऊन शहराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यानंतर त्यांनी शहरातील परीट आळी, संत रोहिदास नगर, बाजारपेठ, कुंभार आळी आदी ठिकाणी विराजमान असलेल्या नवरात्र मंडळांच्या देवींचेही दर्शन घेतले.पालकमंत्री येणार म्हटल्यावर शिवसैनिकांत प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. तळा शहराच्या वेशीवरच युवासेनेने त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर भव्य बाईक रॅली काढून जोरदार स्वागत केले.फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘भरतशेठ आगे बढो’च्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.
या दौऱ्यावेळी पालकमंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुकाप्रमुख प्रदुम्न ठसाळ, कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातू, शहरप्रमुख राकेश वडके, सर्व नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळ्यातील शिवसेनेत नवचैतन्य आणि जोश निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Sunny deol
- जन्मदिन
- October 19
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times