प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल; दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात
- by
- Nov 25, 2026
जलवाहिनी बदलण्यासाठी आवश्यक साहित्य स्वखर्चातून उपलब्ध करून देण्याचा नगरसेविका डॉ. अस्मिता घरत यांचा निर्णय
पनवेल (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक १७ मधील ए-टाइप परिसरातील अनेक चाळींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत होत्या. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका डॉ. अस्मिता जगदीश घरत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, त्यामध्ये हिपॅटायटिस ए (Hepatitis A) चे जंतू आढळून आल्याने समस्येचे गांभीर्य अधिकच वाढले. त्यानंतर करण्यात आलेल्या पुढील तपासणीत चाळ क्रमांक १३ मधील खासगी जलवाहिनी ड्रेनेज लाईनमधून जात असल्यामुळे पाणी दूषित होत असल्याचे निदर्शनास आले.
दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येचे मूळ शोधण्यासाठी सिडको प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच सिडकोच्या जलवाहिन्यांचीही तपासणी करून घेण्यात आली. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने डॉ. अस्मिता घरत यांनी पुढाकार घेतला. दूषित पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी संबंधित जलवाहिनी बदलणे आवश्यक असल्याने या कामासाठी लागणारे साहित्य स्वखर्चातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या जलवाहिनी बदलण्याच्या कामाचा शुभारंभ पनवेलचे महापौर नितीनभाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, नगरसेवक मनोज भुजबळ, सुमित झुंझारराव, नगरसेविका प्रीती जॉर्ज, शिवानी घरत, राजेश्री वावेकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या जनसेवेच्या भूमिकेबाबत बोलताना नगरसेविका डॉ. अस्मिता घरत म्हणाल्या की, माझी आई तथा माजी नगरसेविका सुशीला जगदीश घरत आणि वडील समाजसेवक जगदीश घरत यांनी आयुष्यभर जनसेवेचे व्रत जपले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणाही जनसेवेच्या कार्यात नेहमीच ऊर्जा देणारी ठरते.नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार डॉ. अस्मिता घरत यांनी यावेळी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times