पनवेलमध्ये 'गुरु-शिष्य स्नेहबंधा'चा भावनिक सोहळा; जुन्या आठवणींच्या कल्लोळात हरवले आजी-माजी विद्यार्थी १९८५ ते २००५ च्या बॅचचा स्नेहमेळावा
- by
- Nov 25, 2026
पनवेलमध्ये 'गुरु-शिष्य स्नेहबंधा'चा भावनिक सोहळा; जुन्या आठवणींच्या कल्लोळात हरवले आजी-माजी विद्यार्थी
१९८५ ते २००५ च्या बॅचचा स्नेहमेळावा
पनवेल (प्रतिनिधी) 'ज्यांच्या संस्कारांनी आयुष्याला आकार दिला, त्या गुरुजनांशी पुन्हा एकदा स्नेहाचे धागे विणण्याचा सोहळा...' अशाच काहीशा भावुक आणि चैतन्यमयी वातावरणात नुकताच पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'गुरु-शिष्य स्नेहबंध' हा अभूतपूर्व कार्यक्रम शालेय शिक्षिका श्रीमती वसुधा दळवी पितळे, श्रीमती सुलभा जोशी आणि श्रीमती स्मिता हर्डीकर यांच्या अथक परिश्रमा मुळे मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुजनांप्रती असलेला आदर आणि विद्यार्थ्यांवरील निखळ प्रेम यांचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला.
दळवी मॅडम आणि इतर शिक्षकवृंदांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यासाठी १९८५ ते २००५ या दोन दशकांतील माजी विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. ज्या शिक्षकांच्या मुशीतून हे विद्यार्थी घडले, त्यातील अनेकजण आज समाजजीवनात सर्वोच्च पदांवर विराजमान आहेत. यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासोबतच डॉक्टर, अभियंते, वकील आणि यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावलेले अनेक माजी विद्यार्थी या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा 'विद्यार्थी' बनून एकत्र आले होते.
कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर वृषाली पाटकर यांनी सादर केलेल्या अनोख्या प्रार्थना नृत्याने उपस्थितांची मने जिंकली व सभागृहात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत शेडगे यांनी आपल्या ओघवत्या आणि खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत सोहळ्यात रंगत आणली.
चौकट
आठवणींच्या हिंदोळ्यावर रमले माजी विद्यार्थी

या कार्यक्रमाचा सर्वात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे दळवी मॅडम यांनी केलेला एक आगळावेगळा प्रयोग. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना काही क्षण डोळे मिटण्यास सांगितले आणि आपल्या मधुर शब्दांतून शाळेच्या सुवर्णकाळातील आठवणींना उजाळा दिला. त्या काही क्षणांतच सर्वजण आपला आजचा मोठेपणा, पदाचा भार आणि दैनंदिन ताणतणाव विसरून अक्षरशः शालेय जीवनाच्या त्या निरागस जगात हरवून गेले. अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.
चौकट
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञतेचे ऋण व्यक्त केले. 'आज आम्ही ज्या काही उच्च पदांवर आणि यशाच्या शिखरावर आहोत, त्याचे संपूर्ण श्रेय केवळ या शाळेने लावलेली शिस्त आणि गुरुजनांनी दिलेले दर्जेदार शिक्षण व संस्कार यांनाच जाते,' अशी भावना विद्यार्थ्यांनी दाटून आलेल्या कंठाने व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला हा सोहळा केवळ एक स्नेहमेळावा न राहता, गुरु-शिष्य परंपरेचा एक सुवर्णअध्याय ठरला.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times