न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत मराठी चित्रपटांचा वाजणार डंका!

मराठी चित्रपटांना सातासमुद्रापार नेऊ पाहणार्‍या फिल्मीदेश’ या उपक्रमामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा डंका आता जगभर वाजणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या फिल्मीदेश’ उपक्रमान्वये, भारताबाहेरील रसिकांपर्यंत बहुसंख्य प्रमाणात मराठी सिनेमे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.त्यामुळे, परदेशातील मराठी प्रेक्षकांसाठी त्यांच्या जवळच्या सिनेमागृहात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार आहे. याच उपक्रमांतर्गत, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेली सविता दामोदर परांजपे’, बोगदा’ आणि टेक केअर गुडनाईट’ हे तीन मराठी चित्रपट पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत उतरवली जात आहेत.

चित्रपट मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे नितीन केणी यांचा ‘फिल्मीदेश’ हा उपक्रम मराठी सिनेमांसाठी भविष्यात सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. नितीन केणी यांचे बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मिती आणि वितरणक्षेत्रात मोठे योगदान आहे. गदर, रुस्तम, लंचबॉक्स यांसारख्या हिंदीतील सुप्रसिद्ध सिनेमांसाठी आणि  सैराट, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, दुनियादारी, टाइमपास, लयभारी यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच ते झी स्टुडियोचे माजी सीईओ असून, ‘झी स्टुडियो’ ला नव्या उंचीवर नेण्यास त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे, मराठी चित्रपटसृष्टीची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘फिल्मीदेश’ द्वारे त्यांनी उचलेले हे धाडसी पाऊल खरंच कौतुकास्पद आहे. शिवाय, या कार्यात जागतिकस्तरीय बृहन्महाराष्ट्र मंडळ चा कार्यभाग सांभाळणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले आहे. ‘फिल्मीदेश’ द्वारे प्रदर्शित होणार्‍या सर्व चित्रपटांच्या विदेशी प्रसारणात आशिष चौघुले यांचा हातभार लागणार आहे. फिल्मीदेश’ या उपक्रमाची नांदी बोगदा’, सविता दामोदर परांजपे’ आणि टेक केअर गुडनाईट’ या तीन मराठी सिनेमांपासून होणार आहे. हे सिनेमे फिल्मीदेश’ द्वारे जगभरात दाखवले जाणार असून, या सिनेमांच्या वितरणाबरोबरच जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमाचे कार्यदेखील याअंतर्गत पार पाडले जाणार आहे. भविष्यातील इतर मराठी चित्रपटांचा विदेशी प्रचारदेखील याचपद्धतीने केला जाणार असून, याद्वारे, चित्रपटांच्या निर्मात्यांची गुंतवणूकदेखील सत्कारणी लागणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट