डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु पुण्यात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल? नारळाच्या झाडांवरून नवा वाद Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

यंदाही पनवेलकरांना पाणीटंचाईच्या झळा

दिवसाआड पाणी येणार

पनवेल ः डिसेंबरमध्येच धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ पनवेलकरांवर आली आहे. सध्या धरणांमध्ये पाणी आहे परंतु भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

नगरपालिकेतून महापालिकेत रुपांतरीत झालेल्या पनवेल पालिकेचे कार्यक्षेत्र वाढल्याने रहिवाशांना पिण्याच्या र पाण्याची कमतरता भासू लागली आहे. पाणी समस्याने डिसेंबरपासूनच डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.  पालिका क्षेत्राला सध्या 240 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना त्यात 100 दशलक्ष लिटर पाणी तुटवडा जाणवू लागला आहे. तळोजामधील नागरीक पाण्याच्या टंचाईने बेजार झाले आहेत. या उपनगराला आठ दशलक्ष पाण्याची आवश्यकता असताना केवळ अडीच ते तीन दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन नसताना सिडकोने या भागात 25 हजार घरांच्या महागृहनिर्मितीची घोषणा केली आहे. तसेच आणखी गृहप्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे मूळ पनवेलकरांच्या तोंडचे पाणी विस्तारीत नागरिकरणाने पळविले आहे. गेल्या वर्षी पनवेलमधील पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले होते. पालिकेला नवी मुंबई पालिकेकडे पिण्याचे पाणी टँकरने मागण्याची वेळ आली होती. नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणाची जलवाहिनी याच पनवेल शहराच्या पश्चिम बाजूकडून जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मोरबे, हेटवणे, एमआयडीसी आणि स्वत:च्या देहरंग धरणातून पनवेलकरांची तहाण भागविणार्‍या पालिकेने भाविष्यातील पाणीटंचाईची चाहूल आत्तापासून ओळखून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिका सध्या होणार्‍या पाणीपुरवठ्यात कपात करून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता आहे.

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एक दिवसआड पाणीपुरवठा तसेच शहरातील तलावांचे पाणी संरक्षित केले जाणार आहे. कायमस्वरुपी पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे काम सुरु असून त्याला दोन अडीच वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट