मध्य रेल्वेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा; यशस्वी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सिडकोमध्ये महिला दिन उत्साहात साजरा मेनोपॉजचा त्रास सहन करत बसू नका, सखी तुमच्यासोबत आहे . न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

जैवइंधनापासून विजेची निर्मिती

उरण नगरपालिकेच्या कार्यालयांत करणार विजेचा वापर

उरण : येथील अनेक गावातील घनकचर्‍याची विल्हेवाट कशी लावायती हा यक्ष प्रश्‍न नगरपालिकेसमोर उभा राहिला आहे. यावर उपाययोजना म्हणून उरण नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पात घनकचर्‍यांची विल्हेवाट लावल्यानंतर तयार होणारी वीज ही कार्यालयातील दैनंदिन कामासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कार्यालयातील वीज देयकेही भागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील कचर्‍याच्या विल्हेवाटीचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. त्याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे  रोगराईही पसरू लागली आहे. कचरा उचलण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च केले जात आहेत. असे असले तरी त्याची विल्हेवाट लागत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरपालिकेकडून कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यासाठी घनकचर्‍यांवर प्रक्रिया करून त्यापासून जैवइंधन (बायोगॅस) तयार केले जाणार आहे. या जैवइंधनापासून विजेची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी रोज चार टन ओला कचरा लागणार आहे. तो पालिका क्षेत्रातून गोळा केला जाणार आहे. नगरपालिका कार्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या जैवइंधन प्रकल्पात प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा प्रकल्प येत्या 20 दिवसांत तयार होणार आहे. प्रकल्पातून तयार होणार्‍या विजेचा वापर हा नगरपालिकेच्या कार्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट