..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

ग्रामीण भागातही अँटिजन टेस्ट

नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीपाठोपाठ पनवेलच्या ग्रामीण भागातदेखील अँटिजन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. 3 सप्टेंबरपासून चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

तालुक्यातील नेरे, अजिवली, आपटा, वावंजे, गव्हाण या प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजन टेस्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर उलवे सिडको नागरिक आरोग्य केंद्रातदेखील प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण भागात अँटिजन टेस्टला सुरुवात झालेली असल्याने नागरिकांनी ताप, थंडी किंवा सर्दी झाली असल्यास ताबडतोब टेस्ट करावी, असे आवाहन केले जात आहे. अँटिजन टेस्टसाठी 3 हजार किट प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी एकूण घेतलेल्या टेस्ट 371 असून 23 पॉझिटिव्ह आणि 348 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. अद्याप या अँटिजन टेस्टला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये त्याविषयीची जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट