ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी

पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा दिनांक 07 जुलै रोजी महापालिका मुख्यालयात स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांना मंजूरी देण्यात आली.
यावेळी सर्व स्थायी समिती सदस्य,अतिरीक्त आयुक्त 1 गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त 2 महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त रवीकिरण घोडके, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त अभिषेक पराडकर, शहर अभियंता राजेश कर्डिले, सचिव नानासाहेब कामठे, उपसचिव अक्षय कदम ,महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती-ब, प्रभाग क.१५ सेक्टर-०८, भूखंड क्र.१४, खांदा कॉलनी, न्यु पनवेल येथे माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारणे. या कामाच्या सकारात्मक व नकारात्मकला मान्यता मिळणेबाबतच्या विषय स्थायी समितीने स्थगित केला.
पनवेल महानगरपालिकेच्या सल्लागाराची ५ वर्षाकरीता (प्रथम ३ वर्ष व समाधानकारक पुर्ण झाल्यानंतर २ वर्षे मुदतवाढ) निवडसुचीचे विस्तार (Empanelment) करण्याचा विषय स्थगित करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, खारघर मधील सेक्टर १८ येथील नाल्याचे सुशोभिकरण व विकास करण्याचा विषय स्थायी समितीने मंजूर केला.
पनवेल महानगरपालिका मालकीच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र. ०८, पोदी शाळेची दुरुस्ती करण्याचा विषय एकमताने सर्वांनी मंजूर केला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती 'ब,' सेक्टर ०७, भूखंड क्र. G-१, नविन पनवेल (पूर्व) येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम करणे. या कामास सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय व आर्थिक मान्यता मिळण्याबाबतचा विषय स्थगित करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क, मोठा खांदा गावातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व पूर्वनिर्मित पावसाळी गटार बांधण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती "क" मधील लायन्स गार्डन ते पी. डब्ल्यु. डी. ऑफिस ते जुने कोर्ट ते बंदर नाका (प्लॉट नं. ५०/३३ ते प्लॉट नं. ३४,३६/१,५२०) पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे. या कामाच्या कमी व अधिक Positive & Negative Variation I (Excess/Saving) ला मान्यता मिळण्याबाबतच्या विषयाला मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ब व ड येथील रस्त्यांचे डांबरीकरण व इतर अनुषंगिक कामे करणे. या कामाच्या सकारात्मक व नकारात्मकला मान्यता मिळण्याबाबतचा विषय स्थायी समितीने स्थगित केला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर सेक्टर १०, प्लॉट नं. २५१ वर सामाजिक सभागृह बांधणे या कामाच्या Quantity Variation (परिणाम बदलास) ला मान्यता मिळणेबाबतचा विषयास समितीने मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर ५ भुखंड क्र ११अ, क्षेत्र ११९५.५८ चौ.मी. या ठिकाणी मच्छी मार्केट उभारण्याच्या विषयास मान्यता देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती 'क' व 'ड' क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी दोन वर्षाकरीता विद्युत उपकरणे व विद्युत व्यवस्था भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिका मालकीच्या वाहन विभागाअंतर्गत कार्यरत वाहनांची सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात नियमित सर्व्हिसिंग व आवश्यक नवीन साहित्याची खरेदी करून दुरूस्ती करणे तसेच इतर अनुषंगिक किरकोळ खर्चासआर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळणेबाबतच्या विषयाला मान्यता देण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेच्या शाळा क्र.०१ दि.बा. पाटील शाळेमध्ये बहुउद्देशीय सभागृहात ऑडिओ व्हिजुअल पायाभूत सुविधा स्थापन करणेबाबतचा विषय स्थगित करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक उद्यांनामध्ये / सार्वजनिक ठिकाणी बेंचेस पुरविणेकामी तीन वर्षाकरिता दरकरार करणेबाबतचा विषय स्थगित करण्यात आला.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६७ (३) (क) नुसार तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ५:२:२ अन्वये हिंद-दी-चादर या कार्यक्रमाकरिता खरेदी केलेल्या साहित्यासाठी झालेल्या खर्चास व दरास मान्यता मिळणेबाबतच्या विषयास मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमाकरिता सन २०२२-२०२३ व सन २०२३-२०२४ व सन २०२४-२०२५ या वर्षासाठी व सन २०२५-२०२६ च्या निविदा मंजुर होईपर्यंतच्या कालावधी करिता मंजूर झालेल्या निविदेच्या रक्कमे मध्ये सन २०२६-२०२७ च्या निविदा मंजूर होईपर्यंतच्या कालावधी करिता वाढीव रक्कमेस प्रशासकीय आर्थिक मंजूरी मिळणे बाबतच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.

गुजराती स्मशानभुमी, पनवेल येथील सार्वजनिक शौचालय निष्कासित करुन त्याच परिसरात नवीन सार्वजनिक शौचालय बांधणेकामी मान्यता मिळणेबाबतच्या विषय स्थायी समितीने स्थगित केला.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट