When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पथविक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंत भांडवली कर्ज

  • by
  • Sep 26, 2020

नवी मुंबई : लॉकडाऊनमध्ये  सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटी आहे. पथविक्रेत्यांवर त्याच परिणाम झाला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पथविक्रेत्यांना 10 हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून, नवी मुंबई शहरातील जास्तीतजास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गामुळे पथविक्रेत्यांपुढे भागभांडवलाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेने ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ ही सूक्ष्म पतपुरवठा योजना सुरू केली आहे. यामध्ये पथविक्रेता, ठेलेवाला आदी सहभागी होऊ शकतात. फळे, भाज्या, तयार खाद्यपदार्थ, पाव, अंडी, चहा, चप्पल, कापड, कारागिराद्वारे उत्पादित वस्तू, स्टेशनरी, पानदुकान, पुस्तके आदींचा यात समावेश आहे. ही योजना 24 मार्च म्हणजेच लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी शहरात पथविक्री करीत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू राहणार आहे. यामध्ये पालिकेचा परवाना (ओळखपत्र) प्राप्त असलेले पथविक्रेते आणि ज्यांचे सर्वेक्षण झाले आहे; परंतु परवाना प्राप्त झालेला नाही अशा पथविक्रेत्यांना अर्ज भरता येणार आहे. तसेच जे पथविक्रेते लॉकडाऊनपूर्वी पथविक्री करीत होते; परंतु काही कारणाने त्यांचे सर्वेक्षण झालेले नाही अशा पथविक्रेत्यांना महापालिकेचे शिफारस पत्र आवश्यक आहे. या योजनेंतर्गत नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह 10 हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवलकर्ज घेण्यास आणि त्यांची दरमहा हफ्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. सदर कर्ज विनातारण असणार असून, विहित कालावधीमध्ये किंवा त्यापूर्वी कर्जाची परतफेड करणारे पथविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील भांडवल कर्जासाठी पात्र ठरणार आहेत. व्याजदर बँकांच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे तसेच रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार विहित कालावधीत कर्ज परतफेड केल्यास ते 7 टक्के व्याज अनुदान मिळणार आहे. ही रक्कम अर्जदाराच्या कर्जखात्यात तिमाहीप्रमाणे जमा केली जाईल. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट