वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत आमदार महेश बालदी यांची पनवेल व खालापूर तालुक्यातील वनविभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक
- by
- Nov 28, 2026
वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत आमदार महेश बालदी यांची पनवेल व खालापूर तालुक्यातील वनविभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक, विविध विकासकामे, वनजमिनीचे प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसंदर्भात सकारात्मक चर्चा
पनवेल (प्रतिनिधी): पनवेल व खालापूर तालुक्यातील वनविभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश बालदी यांची राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरिकांच्या समस्या, विविध विकासकामे आणि वनविभागाच्या परवानग्यांअभावी प्रलंबित असलेल्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत खालापूर तालुक्यातील मौजे हाश्याचीपाडी येथील वाडीचा एफ.सी.ए. प्रस्ताव मंजूर करणे, मौजे चौक ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी पीडब्ल्यूडी जागेत परवानगी देणे या विषयांवर चर्चा झाली. तसेच पनवेल तालुक्यातील मौजे डोंगरीचीवाडी-गुंडसे येथील दरडग्रस्त वाडीतील नागरिकांचे दळी जमिनीवर स्थलांतर करणे, मौजे धेरवाडी गावठाणाची जागा स्थलांतरित करणे तसेच मौजे मोरबीमाळ (सवणे) येथील धरणाचा दावा मंजूर करून मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यास परवानगी देणे, अशा महत्त्वपूर्ण विषयांकडे वनमंत्री गणेश नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले. या बैठकीला आमदार महेश बॉडी यांच्या समवेत पदाधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या प्रश्नांवर मंत्री गणेश नाईक व आमदार महेश बालदी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन संबंधित विषयांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. पनवेल व खालापूर तालुक्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत आणि विकासकामांमधील अडथळे दूर व्हावेत, या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times