ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

उरण येथे 1 हजार मेगावॅट वीज प्रकल्पाची गरज

ऊर्जामंत्री नितीन राऊत उरण विज प्रकल्पाला भेट

उरण : दोन आठवड्यापुर्वी दिवसभर मुंबई व उपनगरातील वीज अचानक खंडित झाली होती. त्यामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे राज्यातील विज प्रकल्पांना भेट देऊन विज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या पार्श्‍वभुमीवर त्यांनी गुरुवारी उरण वायू विद्युत निर्मिती केंद्राला भेट दिली. या केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. 

मुंबईत पीक टाईमला सध्या वीजेची गरज 2500 मेगावॅट असते आणि 2030 ला ही गरज 5 हजार मेगावॅट असेल. तसेच 12 ऑक्टोबरला झालेली वीज बंद होण्याची घटना लक्षात घेता मुंबई आणि परिसरात वीज निर्मिती होणे गरजेची आहे. मात्र सध्या केवळ सर्व कंपन्याची मिळून केवळ 1300 मेगावॅट वीज निर्मिती होते. 12 ऑक्टोबरला मुंबई बाहेरून होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्याने  मुंबईतील आयलँडिंग यंत्रणा कोलमडली. मुंबई अंधारात गेली. ही घटना पुन्हा होऊ नये म्हणून विजेची क्षमता वाढवण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत राज्यातील सर्व विज प्रकल्पांना भेटी देत आहेत. या अंतर्गत त्यांनी उरण येथील गॅस थर्मल पॉवर स्टेशनची गुरुवारी पाहणी केली. या वेळेस त्यांच्यासमोर एक सादरीकरण करण्यात आले. या केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल यावेळेस सखोल चर्चा करण्यात आली. अधिकारी वर्गाबरोबरबैठक घेऊन या प्रकल्पात विजेची क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या साधनांची कमतरता आहे यावर चर्चा करुन यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील याची महिती दिली. तसेच उरण येथे किमान 1 हजार मेगावॅटचा वीज प्रकल्प उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे महाजनको कंपनीला असा प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे डॉ राऊत यांनी सांगितले. यावेळी राऊत यांच्या हस्ते प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने राऊत यांची भेट घेऊन नोकरीपासून वंचित असणार्‍या प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत सामावून घेणे तसेच विजेच्या समस्येपासून सुटका करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट