‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

‘त्या’ घरफोडीतील पाच आरोपी अटकेत

82 लाख रुपयांची घरफोडी प्रकरण; 5 नेपाळी सुरक्षारक्षकांना अटक ; 3 आरोपींचा शोध सुरु

पनवेल ः नवीन पनवेल मधील डॉ.रविंद्र इनामदार यांच्या घरात 3 ऑक्टोबर रोजी तब्बल 82 लाख रुपयांची घरफोडी करणार्‍या टोळीतील 5 नेपाळी सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात खांदेश्‍वर पोलिसांना यश आले आहे. या घरफोडीच्या गुह्यात सहभागी असलेले 3 सुरक्षा रक्षक नेपाळ येथे पळून गेल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नवीन पनवेल सेक्टर-19 मध्ये डॉ.रविंद्र इनामदार यांचे श्रेयस हॉस्पीटल असून या हॉस्पीटलच्या तिसऱया व चौथ्या मजल्यावर डॉक्टर आपल्या कुटुंबासह रहाण्यास आहेत. डॉ.इनामदार हे प्रत्येक शनिवार रविवारी कुटुंबासह पुणे येथील आपल्या गावी जात असतात. गत 3 ऑक्टोबर रोजी सुद्धा ते आपल्या गावी गेले होते. याचीच संधी साधुन चोरट्यांनी जिन्याद्वारे डॉ.इनामदार यांच्या चौथ्या मजल्यावरील घरातून 3 किलो वजनाचे 30 सोन्याचे बिस्कीट, 20 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 2 लाख रुपयांचे घड्याळ असा तब्बल 82 लाखांचा ऐवज चोरुन नेला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी डॉक्टर घरी परतल्यानंतर घरफोडीचा हा प्रकार उघडकिस आला होता. या घटनेनंतर खांदेश्‍वर पोलिसांसह गुन्हे शाखेने या घटनेच्या तपासाला सुरुवात केली होती. मात्र, हॉस्पीटलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळुन आल्याने पोलिसांनी त्याठिकाणी कामास असलेल्या सगळ्यांची चौकशी सुरु केली. या तपासादरम्यान, त्या ठिकाणी काम करणारा एक नेपाळी सुरक्षारक्षक गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी संशयावरुन त्याचा माग काढला असता, त्याने इतर नेपाळी सहकार्‍यांच्या मदतीने डॉक्टरच्या घरातील 82 लाखांचा ऐवज चोरुन नेल्याचे आढळुन आले. त्यानुसार पोलिसांनी उत्तरप्रदेश, मुंबई व कळंबोली भागातुन या घरफोडीच्या गुह्यात सहभागी असलेल्या 5 नेपाळी आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून काही ऐवज हस्तगत केला आहे. या गुह्यात सहभागी असलेले तीन सुरक्षारक्षक घरफोडीतील मोठा ऐवज घेऊन नेपाळ येथे पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथक रवाना झाले आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट