मध्य रेल्वेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा; यशस्वी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सिडकोमध्ये महिला दिन उत्साहात साजरा मेनोपॉजचा त्रास सहन करत बसू नका, सखी तुमच्यासोबत आहे . न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

गरजेपोटी घरांबाबत प्रकल्पग्रस्त आक्रमक

दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची रविवारी पार पडली बैठक 

पनवेल : प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत गेले कित्येक वर्षे सिडको प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे आता आरपारची लढाई सुरू केली आहे. रविवारी शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालयामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्र्यांच्या समवेत बैठक घेऊन गरजेपोटी घरे कायम करण्याबाबत प्रथम सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांबाबत दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पाठपुराव्याला आता ठाकरे सरकारच्या माध्यमातून यश मिळत आहे. या सभेमध्ये महत्वाचा ठरलेल्या विषयांमध्ये नवी मुंबई आणि रायगड मधील पनवेल उरण पट्ट्यातील गरजेपोटी बांधलेली घरं कायम करण्याचा मानस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत बैठक घेऊन गरजेपोटी घरे कायम करण्याबाबत प्रथम सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. गरजेपोटी किती घरे बांधली आहेत त्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी तत्काळ रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भूसंपादन अधिकारी यांना सांगून एक महिन्याच्या आत याची माहिती देण्यासाठी पहिली बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी दिली. 

गरजेपोटी बांधलेली घरे कायम ठेवण्यासाठी समितीमार्फत शेतकर्‍यांशी थेट संवाद साधण्यात येणार असल्यामुळे याबाबत पहिली बैठक खारघर येथे शिरीष घरत यांच्या कार्यालयामध्ये पार पडणार असून खारघर परिसरातील जवळपासच्या गावातील शेतकर्‍यांशी चर्चा केली जाणार आहे. तसेच यापद्धतीने दुसरी बैठक तळोजा येथे, तिसरी कामोठे येथे बैठका घेण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने माहिती देण्यात आली. या पार पडलेल्या सभेमध्ये माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळूशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोइर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील, समितीचे सचिव सुदाम पाटील, आर.सी. घरत, गणेश कडू, हेमराज म्हात्रे आदींसह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट