कमी खर्चात प्रभावी उपचार : नवी मुंबई, ऐरोली येथे सहयोग होमिओपॅथिक हॉस्पिटलचे उद्घाटन. कामोठे मध्ये रेल्वे स्थानक परिसर व अग्निशमन दलासाठी राखीव प्लाॅट वरती अतिक्रमणाविरोधी कारवाई Kavach Commissioned of in Prayagraj – Kanpur Section of NCR २०२६ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे जागतिक झुकाव वेगाने; वाहन उद्योगात मोठा बदल डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पनवेलच्या ‘अमृत’ चा मार्ग मोकळा

जेव्हीपीआर कंपनीच्या निवडीला मंजुरी ; महिन्याभरात होणार कामाला सुरुवात

पनवेल : केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेने आखलेली 408 कोटींची पाणी पुरवठा योजना मागील चार वर्षापासून तांत्रिक कारणामुळे रखडली होती. आता कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असल्याने या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार असून कामाचा कालावधी 30 महिन्यांचा आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर पनवेलकरांची पाणीटंचाई कायमची संपण्याची चिन्हे आहेत.

पनवेल शहरवासियांना दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यासाठी 408 कोटींची अमृत पाणी पुरवठा योजना पालिकेने आखली आहे. कधी कंत्राटदाराची पात्रता तर कधी निविदेची क्षमता एवढेच नव्हेतर विविध प्राधिकरण पनवेल व उरणमध्ये कार्यरत असल्याने त्यांचा न मिळणारा निधी यामुळे ही योजना रखडली होती. लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी सचिवालयात याबद्दल आवाज उचलला होता. पनवेल पालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख व विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सचिवालयात केलेल्या शिष्ठाईमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या नस्तीला गती मिळाली आहे. या योजनेमुळे 228 दश लक्ष लीटर पाण्याची उपलब्धता पाताळगंगा नदीतून पनवेलला होणार आहे. यासाठी जेव्हीपीआर या कंपनीची निवड केली असून 247 कोटी रुपयांची विविध कामे पुढील महिन्यापासून सुरू होणार आहेत. 

या कामानंतर पनवेल पालिकेला यातील शंभर एमएलडी, एमएमआरडीए क्षेत्राला 19, जेएनपीटी बंदराला 40 तर सिडको वसाहतींना 69 एमएलडी पाणी मिळणार आहे. 161 कोटी रुपये एमजेपी पंपींग यंत्रसामुग्री व इतर कामांसाठी खर्च करणार आहे. सध्या एमजेपीने पालिका व इतर प्राधिकरणांसोबत करार करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. प्राधिकरणाचा कार्याध्येश देण्याची कार्यवाही झाल्यानंतर प्रत्यक्षात कंत्राटदार काम करु शकेल. सुमारे 25 किलोमीटर लांबीच्या विविध जलवाहिन्यांमध्ये 965 व 1950 मीलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीने पाणी पुरवठा करणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट