न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

साईराज शिल्पकला केंद्र जन माणसांसाठी खुले

आ. मनोहर भोईर आणि बबनदादा पाटील यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन

पनवेल : तालुक्यातील शिरढोण गावचे सुपुत्र दिपक महादेव पाटील यांनी जोपासलेल्या कलेचा आदर करून शिवसेनेचे उरण विधानसभेचे आ.मनोहरशेठ भोईर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ सल्लागार बबनदादा पाटील यांच्या हस्ते साईराज शिल्पकला केंद्राचे उद्घाटन सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

पनवेल तालुक्यातील शिरढोण या गावातील मुंबई-गोवा महामार्गावरील हमरस्त्यावर दिपक महादेव पाटील यांचे घर आहे. राजकारणातील आपली तळमळ आणि धडपड करीत असतानाच कला क्षेत्रातील त्यांची आवड ही वेगळीच आहे. कलेचे एक वेगळे व्यसन पाटील यांना आहे. कुठलेही शिक्षण न घेता थर्माकोल वरून विविध कलाकृती साकारणारे आणि त्यानंतर थर्माकोल बंदी झाल्याने आपल्या कलेचे काय ? असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर खचून न जाता त्यांनी श्री गणेशाचे डेकोरेशन करीत आपली कला जोपासण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले. गेल्या दीड वर्षापासून पाटील यांनी धाडस करून पीओपीपासून कलाकृती बनवण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीच्या काळात त्यांना सुंदर कलाकृती बनविता आल्या नाहीत. मात्र जिद्द न हरता त्यांनी आपले ध्येय सुरु ठेवले. आणि आज अखेर सुंदर कलाकृती बनवून त्यांनी आपली जिद्द पणाला लावली. या कलाकृतीचे दालन जन माणसांसाठी खुले करावे म्हणून 190 उरण विधानसभा मतदार संघाचे आ.मनोहरशेठ भोईर, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, परेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिल्पकला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी दिपक महादेव पाटील यांना शुभेच्छा दिल्या. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट