कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

  • by
  • Jan 05, 2021

पनवेल : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पनवेल शहरातील अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मावळे आणि हत्ती शिल्प लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, एकूण 22 शिल्प उभारण्यात येत आहेत.

रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी येथील महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील व सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी करून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी चौकात  सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण होत आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.

रयतेला लेकराप्रमाणे मानणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महान युगपुरुष होते. अशा वंदनीय श्रद्धास्थानाचा इतिहास शिवप्रेमींबरोबरच समस्त तरुणाईला प्रेरणादायी ठरावा यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी याविषयी सभागृहात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. आता महाराजांच्या पुतळ्याजवळील सुशोभीकरणाला वेग आला असून, येत्या काही दिवसांत सुशोभीकरणाचे काम पूर्ण होऊन पनवेलच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट