सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

महावितरणविरोधात ‘टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन’

पनवेल ः राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम करणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवारी (दि. 05) टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. 

दरमहा 100 युनिट बिल माफ करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते त्यानुसार 12 महिन्यांचे 1200 युनिटचे वीज बिल माफ करा तसेच शेतकर्‍यांचे किमान पाच वर्षे वीज कनेक्शन कापू नये, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.  

कोरोना काळात महावितरकडून भरमसाठ वीज दरवाढ करण्यात  आल आहे. ऊर्जा मंत्र्यांनी वीज ग्राहकांना वीज बिलासंदर्भात गोड बातमी देऊ असे जाहीर केले होते. मात्र गोड ऐवजी कटू कारवाईचा बडगा उचलला आहे. कोरोना काळात सर्वसामान्य जनता भरडून निघाली असताना राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात बिल कमी न करता  सेक्शन 66 अंतर्गत कनेक्शन तोडण्याचा धडाका लावला आहे. महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना वीज जोडणी तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे काम केले आहे, त्याचा निषेध करण्यासाठी महावितरविरोधात टाळे ठोका व हल्लाबोल आंदोलन व निषेध करण्यात आला. वीज बिल कमी करा गोरगरिबांना बिलात माफी द्या  अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे काही स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाले होते. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट