न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

गाड्या भाड्याने लावण्याच्या बहाण्याने विक्रि

दोन अटकेत, एक फरार तर एकाने केेली आत्महत्या

पनवेल ः महागड्या गाड्या वेगवेगळ्या कंपनीत भाड्याने लावतो असे सांगून लोकांकडून बहाण्याने त्यांचा विश्‍वास संपादन करून सदर गाड्या परस्पर विकणार्‍या टोळीपैकी दोघाजणांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. तर यातील तिसर्‍या आरोपीने आत्महत्या केली असून चौथ्या आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.

पनवेल परिसरातील तसेच मुंबई येथील डी.बी.मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील विविध लोकांना तुमच्या नवीन गाड्या आम्ही वेगवेगळ्या नामांकित कंपनीमध्ये भाड्याने लावतो व त्याबद्दल तुम्हाला दरमहा 18 हजार रुपये देवू, असे सांगून रितसर करार करून सुरूवातीचे काही महिने ठरलेले भाडे देवून त्यानंतर भाडे देण्यास टाळाटाळ करून लोकांकडून घेतलेल्या गाड्या परस्पर विकून टाकण्याचा प्रकार या टोळीमार्फत करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मुंबई येथील एका संगणक व्यावसायिकाला 1 करोड 08 लाख 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार सुद्धा या टोळीविरुद्ध दाखल करण्यात आली होती. या संदर्भात पोलिस  पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या नुसार सदर आरोपींचा शोध घेतला असता यातील आरोपी राजशेखर गौडा (50) याने आपण पकडले जावू या भितीने आत्महत्या केली आहे. तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सुरज पाटील व करण उर्फ जगदीश चौधरी यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन पकडून त्यांच्याकडून जवळपास 41,68,000 रुपये किंमतीची दहा वाहने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा ऐेवज हस्तगत करण्यात आला आहे. तर एक आरोपी फरार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट