वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

घराच्या चौकटीतून व्यवसायविश्वात... मनीषा भगवान बोरुडे यांनी घडवली स्वतःची नवी ओळख

  • by
  • Jul 14, 2026

घर आणि कुटुंबाची जबाबदारी साभाळत अनेक महिला स्वतःची स्वप्ने मनातच दडपून ठेवतात. मात्र योग्य वेळी घेतलेला एक धाडसी निर्णय आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो, हे मनीषा भगवान बोरुडे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. आज त्या साड्या आणि कपड्यांच्या व्यवसायातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असून, त्यांच्या या प्रवासामागे जिद्द, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा पाठिंबा हेच त्यांच्या यशाचे खरे बळ ठरले आहे.

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मनीषा बोरुडे या पूर्णवेळ गृहिणी होत्या. घराची जबाबदारी, मुलांचा सांभाळ आणि इतरांना मदत करण्यातच त्यांचा दिवस जात असे. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यात त्यांना समाधान मिळत होते. मात्र मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनात एक विचार सतत येऊ लागला— "आता स्वतःसाठीही काहीतरी करायला हवे." याच विचारातून त्यांनी साड्या आणि कपड्यांच्या व्यवसायात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला.

व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर पहिले पाऊल उचलले. बचत गटातून आर्थिक मदत घेतली, एका होलसेल विक्रेत्याशी संपर्क साधला आणि साड्या व कपड्यांचा माल घेऊन घरातूनच व्यवसाय सुरू केला. स्वतंत्र दुकान नसतानाही त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

हा प्रवास मात्र सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांच्या पतींची व्यवसायासाठी संमती नव्हती. पण आपल्या निर्णयावर ठाम राहत त्यांनी विरोधाला न घाबरता व्यवसाय सुरू केला. आज त्या याच निर्णयाकडे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहतात.

या प्रवासात त्यांच्या मुलीने दिलेली साथ त्यांच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरली. व्यवसाय सुरू करण्यापासून ते प्रत्येक टप्प्यावर मुलीने त्यांना प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर कुटुंबीय आणि शेजाऱ्यांचे सहकार्यही त्यांना वेळोवेळी मिळत गेले.

आज त्यांचा व्यवसाय वाढीच्या टप्प्यावर आहे. अजूनही तो विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत असला तरी त्यांनी अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. पावसाळ्यासारख्या काळात विक्री कमी झाल्याने आर्थिक ताण जाणवतो, कारण विक्रीतून मिळणाऱ्या पैशातूनच नवीन माल खरेदी करावा लागतो. मात्र अशा अडचणींनाही त्या खंबीरपणे सामोऱ्या जात आहेत.

गृहिणी म्हणून जगलेले आयुष्य आणि आज उद्योजिका म्हणून जगत असलेले आयुष्य यात त्यांना मोठा बदल जाणवतो. पूर्वी त्या केवळ घरापुरत्या मर्यादित होत्या; आज त्या स्वतः निर्णय घेतात, ग्राहकांशी संवाद साधतात आणि स्वतःच्या कष्टावर स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. हा बदल त्यांच्यासाठी केवळ आर्थिक नसून आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढवणारा ठरला आहे.

आज मनीषा भगवान बोरुडे अभिमानाने सांगतात, "पूर्वी कधी व्यवसाय करेन असे वाटले नव्हते. पण आज स्वतःच्या पायावर उभी आहे, याचा मला अभिमान आहे. पुढे हा व्यवसाय आणखी मोठा करण्याचे माझे स्वप्न आहे. योग्य साथ आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर ते नक्की पूर्ण करेन."

मनीषा भगवान बोरुडे यांची ही कहाणी सांगते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवर विश्वास, मेहनत आणि जिद्द असेल तर प्रत्येक महिला स्वतःची नवी ओळख घडवू शकते.

रिपोर्टर

  • Tejal Manali Tushar Khanvilkar
    Tejal Manali Tushar Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Manali Tushar Khanvilkar

संबंधित पोस्ट