सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

कोविशील्डच्या दुसर्‍या डोसचे अंतर वाढले

दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचं अंतर असावं ; सरकारी समितीची शिफारस

नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाविरोधात सुरु असलेल्या लसीकरण अभियानात दोन लसींचा वापर होत आहे. नागरिकांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींचे प्रत्येकी दोन डोस दिले जात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरु केल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होऊ शकलेलं नाही. याच दरम्यान एका सरकारी पॅनलने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली आहे.

सरकारच्या छढअॠख या समितीने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्याची शिफारस केली आहे. तर कोवॅक्सिनच्या डोसमधील अंतरात कोणताही बदल केलेला नाही. तर गर्भवतींच्या लसीकरणाबाबतही समितीने महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

समितीने केलेल्या शिफारशी 

  • कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये तीन ते चार महिन्याचं (12 ते 16 आठवडे) अंतर ठेवण्याची शिफारस सरकारच्या छढअॠख समितीने केली आहे. तर कोवॅक्सिनसाठी कोणताही बदल नाही. कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये पहिल्या सूचनेनुसार 28 दिवसांचं अंतर असेल.
  • गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस ऐच्छिक आहे, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर बाळांना स्तनपान करणार्‍या माता प्रसुतीनंतर कधीही लस घेऊ शकतात.
  • कोविड-19 पॉझिटिव्ह झालेल्या नागरिकांनी बरं झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस घ्यावी, अशी शिफारसही समितीने केली आहे.
2 ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिनच्या चाचणीला परवानगी
2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची क्लिनिकल चाचणी घेण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. तज्ज्ञ समितीने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीच्या दुसर्‍या/तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीसाठी शिफारस केली होती. त्याला आता डीजीसीआयकडून परवानगी मिळाली आहे. 525 स्वयंसेवकांवर ही चाचणी होणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट