३० वर्षांवरील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा
- by
- Aug 21, 2026
चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत वसतिगृह प्रवेशाच्या प्रश्नावर राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी दोन दिवस सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.
राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत ४९० शासकीय वसतिगृहे चालविली जात असून, दरवर्षी सुमारे ५८ ते ६० हजार विद्यार्थी येथे निवास करून शिक्षण घेतात. १४ ऑगस्ट २०२६ रोजी वसतिगृह प्रवेशासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी ३० वर्षांची वयोमर्यादा असावी, या मागणीवरही शासनाने सकारात्मक विचार केला आहे. नवीन शासन निर्णयामुळे ३० वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सुविधेचा लाभ केवळ पारंपरिक अभ्यासक्रमांपुरता मर्यादित राहणार नसून पीएच.डी., एम.फिल., पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण आणि इतर विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३० वर्षांवरील पात्र विद्यार्थ्यांनाही देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.
“शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये” या भूमिकेतून आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पष्ट केले. आर्थिक परिस्थिती किंवा वसतिगृहाची अनुपलब्धता उच्च शिक्षणाच्या मार्गात अडथळा ठरू नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संवादातून सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून, विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times