डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु पुण्यात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल? नारळाच्या झाडांवरून नवा वाद Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

‘त्या’ आरोपींच्या जामिनाला तीव्र विरोध

अश्विनी बिद्रे हत्याकांड ; पुढील सुनावणी 2 जून रोजी

पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपींनी उच्च- न्यायालयाच्या कोरोना गाईडलाईनप्रमाणे जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सोमवारी पनवेल सत्र न्यायालयात याबाबत युक्तिवाद करण्यात आला.

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील खटल्याची सध्या सुनावणी सुरू असून आतापर्यंत 12 साक्षीदार तपासले गेले आहेत. या प्रकरणातील बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील ऊर्फ ज्ञानदेव पाटील, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. जर आरोपींना जामीन दिला तर खटल्यावर विपरीत परिणाम होईल असा युक्तिवाद सरकारी वकील घरत यांनी केला. उच्च न्यायालयाच्या कोरोना गाईडलाईनप्रमाणेसुद्धा आरोपी जामिनासाठी पात्र नाहीत, कारण यांनी केलेला गुन्हा खूप गंभीर असल्याने या गुन्ह्याला फाशीची शिक्षा होऊ शकते असे मत वकील प्रदीप घरत यांनी मांडले. हा खटला हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चालवून साक्षीदार तपासले जावेत अशी मागणी गेल्या सुनावणीला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी लेखी स्वरूपात केली होती. यावर आरोपीच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खटल्याची सुनावणी घेण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी दोन्हीकडील म्हणणे ऐकल्यावर जामिनावर निर्णय पुढील सुनावणीदरम्यान घेण्यात येईल असे सांगितले. पुढील सुनावणी 2 जून रोजी ठेवण्यात आली आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट