न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

20 लाखांचा गुटखा जप्त

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने करावे येथून 20 लाखंाचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याने विक्रीसाठी या गुटख्याची साठवणूक केली होती. सदर गुटख्याचा साठा त्याने कुठून आणला याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात नशा मुक्ती अभियान राबवले जात असून अमली पदार्थ विरोधी कारवायांवर जोर देण्यात येत आहे. यादरम्यान सीवूड्स येथील करावे गाव येथे किराणा स्टोअर्स चालविणार्‍या दुकानदाराने आपल्या घरामध्ये गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक जयराज छापरिया यांनी पोलीस निरीक्षक अश्विनी कुसूरकर, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, हवालदार कासम पिरजादे, इकबाल शेख, महेश शेट्टे, तुकाराम सूर्यवंशी, राजेश सोनावणे, राहुल वाघ, देवमन पवार यांचे पथक केले होते. त्यांनी मंगळवारी दुपारी करावे सेक्टर 36 येथील लक्ष्मी किराणा स्टोअर या दुकानावर छापा टाकला. त्यामध्ये दुकानात व दुकानदार राजूराम आसाराम देवासी याच्या घरातून तब्बल 20 लाख 46 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सदर गुटखा जप्त करून देवासी विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूराम देवासी याला अटक करुन त्याला एनआरआय पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट