डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु पुण्यात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल? नारळाच्या झाडांवरून नवा वाद Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

विद्यार्थ्यांकरिता 6 शिष्यवृत्ती योजना

नवी मुंबई ः विविध समाज घटकांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत विविध  लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणार्‍या 6 योजनांकरिता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे पालिकेने केले आहे. 

या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणे विद्यार्थी व पालकांना सुलभ व्हावे याकरिता सहजसोपी प्रक्रिया राबविण्यात येत असून ज्या विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या वर्षातील शिष्यवृ्त्ती योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनी अर्जासोबत केवळ नव्याने देणे आवश्यक आहे अशी गुणपत्रिका, शाळेचे शिफारसपत्र, उत्पन्न दाखला, शहारातील 3 वर्षांचे वास्तव्य ठिकाण बदलले असल्यास सध्याच्या रहिवासाचा पुरावा, कंत्राटदार / विभागप्रमुखाचे प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. इतर कागदपत्रांची शहनिशा यापूर्वीच्या उपलब्ध अभिलेखातून करण्यात येणार आहे. तथापि काही कारणामुळे सन 2019-20 मधील शिष्यवृत्तीधारकांचे अर्ज अभिलेख्यामध्ये उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यांना समाजविकास विभागाच्या उपायुक्त यांचे मान्यतेने आवश्यक कागदपत्रे सात दिवसात कार्यालयात जमा करण्याबाबत दूरध्वनीव्दारे कळविण्यात येईल. सदर 7 दिवसांच्या मुदतीत संबंधितांनी कागदपत्रे सादर न केल्यास सन 2020-21 करिता सादर केलेला अर्ज अपात्र होईल.

तसेच सन 2019-20 च्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेल्या ज्या अर्जदारांना पुन्हा स्वेच्छेने अर्ज करावयाचा आहे त्यांना तो नव्याने सादर करता येईल.तथापि ज्यांनी सन 2019-20 च्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा सन 2020-21 करिता नव्याने अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी, सायं. 6.15 नंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती योजनांचा महानगरपालिका क्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

  • या 6 योजनांचा समावेश
    (1) विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
    (2) आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणार्‍या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.  
    (3) इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
    (4) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
    (5) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नमुंमपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
    (6) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट