मध्य रेल्वेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा; यशस्वी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सिडकोमध्ये महिला दिन उत्साहात साजरा मेनोपॉजचा त्रास सहन करत बसू नका, सखी तुमच्यासोबत आहे . न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

“मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट

मुंबई : “मी लवकरच पत्रकारांशी बोलेन. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही. मला पळवले गेले.” असा गौप्यस्फोट ड्रग्ज माफिया ललित पाटील याने केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने पोलिसांनी अटक केलेल्या ललितसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कॅमेऱ्यासमोर ललितने ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता ललित पाटीलच्या फरार होण्याच्या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे? तसेच ललितला नेमके काय सांगायचे आहे, असा प्रश्न निमित्ताने उपस्थित होत आहे.


पुण्यातील ससून रुग्णालयातून पळ काढून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी मोठ्या शिताफीने दक्षिण भारतातील चेन्नई येथे लपून बसलेल्या ललित पाटीलला अटक केली आहे. त्याच्या शोधासाठी दहा पथके तयार करण्यात आली होती. अखेर काल 17 ऑक्टोबरला, मंगळवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ललित पाटीललला मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याचे तपासणी करण्याकरिता त्याला रुग्णालयात नेण्यात येत असताना एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ललितशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने मी लवकरच पत्रकारांशी बोलेन, असे सांगितले.

यानंतर रुग्णालयात नेण्यात आलेल्या ललितसमोर कॅमेरा नेला असता, त्याने पुन्हा “मी ससून रुग्णालयातून पळालो नाही. मला पळवले गेले. कोणाकोणाचा हात आहे, हे सर्व सांगेन,” असे सांगितले. ज्यामुळे आता ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्ज प्रकरणातील अनेक बड्या माफियांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. तर ललितला नेमके कोणी पळवले होते. यामध्ये नेमके कोणाचा हात आहे, असा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. ललित पाटील याला जर का माध्यमांसमोर बोलण्याची संधी देण्यात आली तर तो त्याच्या फरार होण्यात नेमका कोणाचा हात आहे, हेही सांगण्याची शक्यता आहे. परंतु ललित हा ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने पोलिसांकडून सर्वच बाबतीत मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा मात्र फरार झाला होता. पोलिसांच्या हातावर तुरी देत ललित फरार झाल्याने पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात होते.

ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. येथे 9 महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. पोलिसांनी चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथे ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचे समोर आले. ज्यानंतर पोलिसांनी भूषण पाटील याला अटक केली.

“बऱ्याच गोष्टी बाहेर येतील”, देवेंद्र फडणवीसांचा दावा

ललित पाटील प्रकरणात आणखी काही तथ्य लवकरच समोर येतील, असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला आज अंधेरी न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलला न्यायलयात हजर करण्यात आले होते. “पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका आहे”, असा दावा ललित पाटील यांनी न्यायालयात केला आहे.

ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ड्रग्ज प्रकरणात मोठे लागे बंदे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्या दिशेने तपास करण्यात आला. सर्व युनिट कामाला लागले असून तपास करत असताना मुंबई पोलिसांना नाशिकमधील कारखान्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी नाशिकच्या कारखान्यावर छापा टाकला. राज्यातील ज्या वेगवेळ्या ठिकाणी ड्रग्जचे काम सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. यानंत पोलिसांच्या हाती ललित पाटील आला. या प्रकरणातून निश्चित मोठे धागेदोरे बाहेर येतील, काही गोष्टी ज्या मला कळाल्या असून मी त्या तुम्हाला सांगू शकत नाही. योग्य वेळी मी ऐवढेच सांगतो की, या प्रकरणातून मोठा नेटवर्क बाहेर काढणार आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट