प्रवाशांच्या सुविधांसाठी खासदार नरेश म्हस्के यांनी काढली रेल्वे अधिकाऱ्यांची खरडपट्टी
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासास गती द्या
ठाणे - पनवेल लोकल फेऱया वाढवा
कल्याण- बदलापूर, कल्याण- आसनगाव चौथ्या मार्गीकेचे काम लवकर मार्गी लावा
दुरांतो एक्सप्रेसला ठाणे-पनवेल थांबा द्या
दिघा येथील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करा
मुंबई विभागीय विभागीय समितीच्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांच्या विविध मागण्या, रेल्वे अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
वेलंकणी यात्रेसाठी जुलै महिन्यात ठाणे विभागातून विशेष गाडी सुटणार
मुंबई - रेल्वेच्या प्रश्नांबाबत मुंबई विभागातील खासदारांच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज चिंतन हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीत रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आणि सुविधांवरुन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासास गती द्या, ठाणे - पनवेल लोकल फेऱ्या वाढवा, कल्याण- बदलापूर, कल्याण- आसनगाव चौथ्या मार्गीकेचे काम लवकर मार्गी लावा, दुरांतो एक्सप्रेसला ठाणे-पनवेल थांबा द्या, दिघा येथील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करा, आदी विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केल्या. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार उज्ज्वल निकम, रेल्वे प्रशासनाच्या वतीने राजीव श्रीवास्तव (महाप्रबंधक, मध्य रेल्वे), हिरीष मीना (मंडल रेल्वे प्रबंधक), विवेक सागर (मुख्य सुरक्षा आयुक्त), रजनीश माथुर (प्रधान मुख्य अभियंता), भुवनेश कुमार यादव (मुख्य प्रशासकीय अधिकारी), अक्षय सक्सेना (मुख्य प्रशासकीय अधिकारी) तसेच पी. के. चतुर्वेदी (सचिव, मध्य रेल्वे) उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनातील अधिकारी प्रवाशांना सुविधा देण्यात चालढकल करत असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीच्या प्रारंभीच त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. प्रवाशांना तातडीने मुलभूत आणि पायाभूत सुविधा तातडीने देण्याची सूचना त्यांनी केली.
अमृत भारत स्टेशन अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेबाबतसुध्दा चालढकल सुरु आहे. रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ठाणे रेल्वे स्थानाकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी पुनर्विकासाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे सांगितले.
ठाणे रेल्वे स्थानकांत आज सात ते आठ लाख प्रवासी प्रवास करत असल्याने मुलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, स्वच्छता यांवरुनही खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
ठाणे रेल्वे स्थानकातील एफओबी आणि एक्सलेटरची कामे संथ गतीने सुरु आहेत. २ नवीन एक्सलेटर आणि १ लिफ्टचे काम प्रस्तावित आहे, या कामांना गती देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, आसनगाव, टिटवाळा मार्गावर अधिक लोकल सुरु करण्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत आवाज उठवला.
कल्याण- बदलापूर, कल्याण- आसनगाव येथे चौथ्या मार्गीकेचे काम सुरु आहे. या कामाला गती देऊन काम पूर्ण करून अधिकच्या गाड्या या मार्गांवर सोडण्याची तसेच ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-पनवेल-ठाणे मार्गावर अधिकच्या लोकल सोडण्याची व मध्यरात्री पर्यंत सुरु ठेवण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
दुरोंतो एक्सप्रेसला पनवेल, ठाणे येथे थांबा द्यावा; सिवुड आणि उरण मार्गावर ट्रेनची संख्या वाढवी; गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवावी; दिघा येथील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेस हस्तांतरीत करावे, कळवा- ऐरोली उन्नत मार्गाच्या कामाला गती द्यावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीटात असलेली सवलत पुन्हा सुरु करावी, अशा विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. या सर्व मागण्यांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दखल घेत तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.
वेलंकणी यात्रेसाठी ठाणे लोकसभा क्षेत्रातून 30 ते 35 हजार भाविक जात असतात. भाविकांसाठी ठाणे विभागातून विशेष गाडी सोडण्यासाठी खासदार नरेश म्हस्के पाठपुरावा करत होते. त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून जुलै महिन्यात ही विशेष एक्सप्रेस सुटणार आहे. याबद्दल तसेच ट्रान्स हार्बर मार्गा वरील तीन स्थानके मध्य रेल्वे कडे हस्तांतरित झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत विशेष आभार मानले. तसेच उरलेली स्थानके ही लवकरात लवकर सिडको कडून मध्ये रेल्वे कडे हस्तांतरित करून घेण्याची सूचना केली.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times