आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी
मुंबई : आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या एकूण 34 याचिका असून या सर्व 34 याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यावर आज (20 ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीत राहुल नार्वेकरांनी 34 याचिका 6 गटात एकत्र करून या याचिकांवर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. यावेळी राहुल नार्वेकरांनी दोन्ही पक्षांना 25 ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत सादर केलेली कागदपत्रे सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विविध याचिकांवर सुनावणी घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विधानसभा अध्यक्षांसोबत दसऱ्याच्या सुट्टीमध्ये एकत्र बसून याचिकांचे वेळापत्रक ठरवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आज नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत महत्वपूर्ण आदेश दिले.
विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतल्यानंतर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे वकील प्रवीण टेंबेकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली. पुरावे देण्यासाठी आम्हाला अध्यक्षांनी वेळ वाढवून दिला आहे. 1 ते 16 ची 1 याचिका, 17 ची वेगळी 2 याचिका केली आहे. अशा 6 याचिका करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया लवकर व्हायची असेल तर उद्धव ठाकरे गटाने वारंवार अर्ज करु नये, असे अध्यक्षांचे म्हणणे आहे. 26 ऑक्टोबरनंतर इशू फ्रेम होतील आणि सुनावणीला सुरुवात होणार, असे टेंबेकर म्हणाले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times