गायिका वैशाली शिंदे यांच्या निधनाने परिवर्तन चळवळीचा बुलंद आवाज हरपला : रामदास आठवले
मुंबई - आंबेडकरी चळवळीला जीवन समर्पित केलेल्या गायिका वैशाली शिंदे यांच्या निधनाने परिवर्तन चळवळीचा बुलंद आवाज हरपला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवगंत लोकगायिका वैशाली शिंदे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.घाटकोपर असल्फा व्हिलेज येथिल वैशाली शिंदे यांच्या निवास स्थानी त्यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेऊन ना.रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. असल्फा ते बर्वे नगर स्मशानभूमी येथे अंत्ययात्रा काढून दिवगंत वैशाली शिंदे यांच्या पार्थीवावर आज अंत्य संस्कार करण्यात आले.
दिवगंत गायिका वैशाली शिंदे या के. एम रुग्णालयात दाखल होत्या.मधुमेहामूळे त्याच्या पायाला गेगरिन झाल्यामुळे त्यांचा एक पाय काढण्यात आला होता त्यावर मात करुन वैशाली शिंदे या रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्पामात उपस्थित राहुन गाणे सादर केले होते.मात्र त्यानंतर त्या अनेक दिवस त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या.मधुमेह आणि गेगरिन मुळे त्याचे के.एम रुग्णालयात आज निधन झाले.आज घाटकोपर असल्फा येथे दिवगंत वैशाली शिंदे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यात ना.रामदास आठवले, रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनावने,साधु कटके, सुमित वजाळे,भदंत्तविरत्न थेरो,गायक अशोक निकाळजे,संजय पारडे,संदेश मोरे आदि अन्यमान्यवर उपस्थित होते.
गायिका वैशाली शिंदे या त्यावेळी त्या प्रचंड लोकप्रिय गायिका होत्या.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पुर्ण श्रध्दा ठेऊन भिमगीते गात होत्या त्याच अंत्यत गोड आवाज होता.तेवढ्याच प्रखर आणि पहाडी आवाजाच्या गायिका होत्या.आंबेडकरी चळवळीत त्या लोकप्रिय होत्या. रिपब्लिकन पक्षाला एकनिष्ठ पाठिंबा देणाऱया गायीका होत्या.माझ्या नेतृत्वावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. गायिका वैशाली शिंदे येंच्या निधनाने आंबेडकरी वळवळीची मोठी हानी झाली आहे.अशी शोक भावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.येत्या दि.28 ऑक्टोबर रोजी घाटकोपर पश्चिम असल्फा व्हिलेज येथे सायंकाळी दिवंगत वैशाली शिंदे यांची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहिर श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times